शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

फुटिरांवर पाच पांडव भारी; आयात केलेल्या आमदारांकडून भाजपच्या पदरी निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2024 10:01 IST

नुवे, कुडतरी, बाणावली, वेळ्ळी, नावेली, कुंकळ्ळीत मोठी आघाडी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून राज्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांना पक्षात घेण्याच्या भाजपच्या रणनीतीचा लोकसभा निवडणुकीत पुरता फज्जा उडाला आहे.

काँग्रेसमधून आलेल्या आमदारांकडून दोन्ही मतदारसंघांत पक्षाच्या पदरी निराशाच पडली असताना काँग्रेसने मात्र चांगली कामगिरी केली असून फुटीर आमदारांवर 'पाच पांडव' भारी पडले आहेत. दक्षिणेत दिगंबर कामत यांच्या मडगावात भाजपला मोठी आघाडी मिळणार, अशी अपेक्षा केली जात होती. त्याचबरोबर त्यांच्या प्रभावाचा मडगावच्या शेजारच्या विधानसभा मतदारसंघातही फायदा होईल, असेही भाजपला वाटले होते. परंतु शेजारच्या मतदारसंघात तर आधाडी मिळालीच नाही. परंतु खुद्द महगावात अवघ्या ८६ मतांची आघाडी ते भाजपला देऊ शकले आहेत. 

मुरगावात संकल्प आमोणकर भाजपमध्ये आल्यामुळे पक्षाला फायदा अपेक्षित होता. परंतु या ठिकाणीही अपेक्षेएवढी मते मिळाली नाहीत. केवळ २०६७ मतांची आघाडी मिळाली आहे. मंत्री बनविलेले आलेक्स सिक्वेराही भाजपला केवळ ३७८३ इतकीच मते देऊ शकले, या ठिकाणी काँग्रेसला ११ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. उत्तर गोव्यातही तशीच परिस्थिती आहे. सांताक्रूझ मतदारसंघात आमदार रुडाल्फ फर्नाडिस भाजपला आघाडी देऊ शकले नाहीत.

कळंगुटमध्ये तर आमदार मायकल लोबो हे काँग्रेसला २१५७ मतांची आघाडी घेण्यापासून रोख, शकले नाहीत. शिवोलीत दिलायला लोबो याच्या मतदारसंघात अवघ्या २९६७ मतांची आघाडी, तर आमदार राजेश फळदेसाई यांच्या मतदारसंघात केवळ १३२३ मतांची आघाडी मिळाली आहे.

दुसऱ्या पक्षाचे आमदार घेण्याची भाजपची ही रणनीती उपयोगी पहली नाही, पेगळ्या पद्धतीने मिशन सासष्टी राबविण्याचा प्रयत्नही यशस्वी झाला नाही. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांचे यापुढे पक्षात काय महत्त्व असेल, याबद्दलही अनिश्चितता निर्माण झाली आहे.

पाच जणांची ताकद...

काँग्रेसचे उमेदवार कैंटन विरिवातो फर्नाडिस यांनी विजयानंतर पाच पांडवांची कमाल असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कुंकळळीचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाय, केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता, बाणावलीचे आपचे आमदार वैझी व्हिएगश, वेळळीचे फूज सिन्या आणि फातोड़ांच आमदार तथा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई या पाच जणांमुळे विजय सुकर झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

खलपांना मांद्रे, पेडणेत धक्का

उत्तर गोव्यात भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी डबल हॅट‌ट्रिक केली. मोठ्या मताधिक्याने त्यांनी हा विजय मिळवला. विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी माई व पेडणे मतदारसंघांमध्ये अर्थात त्यांच्या 'होम ग्राउंडवर मोठे मताधिक्य अपेक्षित धरले होते; परंतु तिथेच त्यांचा भ्रमनिरास झाला. या दोन्ही मतदारसंघात त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. निकालानंतर प्रसारमाध्यमांकडे बोलताना रमाकांत खलप म्हणाले की, हा निकाल माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर कारणमीमांसा केली जाईल.

 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल