शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भगवानपरशुरामाविषयी अपशब्द वापरल्यामुळे गोव्यात असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 04:41 IST

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बाणावली (दक्षिण गोवा) येथे झालेल्या सभेत एक निदर्शक रामकृष्ण जल्मी यांनी भगवानपरशुरामाविषयी अपशब्द वापरल्यामुळे सध्या वादंग माजले आहे.

पणजी-फोंडा-मडगाव-वास्को : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बाणावली (दक्षिण गोवा) येथे झालेल्या सभेत एक निदर्शक रामकृष्ण जल्मी यांनी भगवानपरशुरामाविषयी अपशब्द वापरल्यामुळे सध्या वादंग माजले आहे. याबाबत विविध ठिकाणांहून अनेक धार्मिक संस्थांनी पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंद केलेल्या आहेत. त्यांच्या आधारे गोवा पोलिसांनी जल्मी यांना रात्री अटक केली आहे. दरम्यान, सीएएविरोधी आंदोलकांनी जल्मी यांचे वादग्रस्त विधान हे त्यांचे वैयक्तिक विचार असल्याचे म्हटले आहे. आंदोलनाशी त्यांचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.सभेत त्यांनी परशुरामाविषयी वादग्रस्त विधाने करताना अनेक अपशब्दही वापरल्याचा आरोप संस्थांनी केला आहे. त्यांच्या भाषणाची ध्वनिचलचित्रफित (व्हिडीओ) समाजमाध्यमात प्रसारित झाली आहे. त्यामुळे या घटनेची दखल घेत अनेकांनी पणजी पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदविली आहे.बाणावलीत दांडो मैदानावर २९ फेब्रुवारीला ‘पीपल्स फोरम फॉर जस्टीस, सेक्युलरिझम आणि डेमॉक्रसी’ यांनी सभा भरविली होती. जल्मी यांच्याविरुध्द कोलवा पोलीस ठाण्यात गौरांग प्रभू मळकर्णेकर यांनी तक्रार नोंदविली आहे.