शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खंवटेप्रश्नी राज्यपालांना साकडे, तोडगा निघेल- कामत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 22:55 IST

अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना मध्यरात्री झालेल्या अटकेबाबत न्याय मागण्यासाठी सर्व विरोधी आमदारांनी शुक्रवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली.

पणजी : अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना मध्यरात्री झालेल्या अटकेबाबत न्याय मागण्यासाठी सर्व विरोधी आमदारांनी शुक्रवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. त्यांनी राज्यपालांसमोर स्थिती मांडली व या विषयात लक्ष घालावे अशी त्यांनी राज्यपालांना विनंती केली. आपण याविषयी सरकारशी बोलेन, असे आश्वासन राज्यपालांनी विरोधी आमदारांना दिले.विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रतापसिंग राणे, रवी नाईक, लुईङिान फालेरो, विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर, खंवटे, जयेश साळगावकर, आलेक्स रेजिनाल्ड व विनोद पालयेकर हे नऊ आमदार दुपारी एकच्या सुमारास दोनापावल येथे राजभवनवर गेले. तत्पूर्वी त्यांनी सभात्याग केला होता. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना एखाद्या आमदाराला खोटय़ा तक्रारीवरून मध्यरात्री अटक होते हे गंभीर आहे असा मुद्दा कामत यांनी राज्यपालांसमोर मांडला. राज्यपाल जास्त काही बोलले नाही पण आपण सरकारशी बोलेन अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्व विरोधी आमदारांनी एकत्रपणो एक निवेदनही राज्यपालांना सादर केले. लोकशाही धोक्यात आहे, असे आमदार म्हणाले.दरम्यान, कामत यांनी नंतर पत्रकारांना सांगितले, की चार माजी मुख्यमंत्र्यांना सभागृहातून सभापतींकडून बाहेर काढले जाते व मग सरकार अर्थसंकल्पाचे वाचन करते असे गोव्याच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. आम्ही खंवटेंच्या अटकेविषयी निर्माण झालेला वाद सोडवा अशी विनंती सभापतींना करत होतो पण कुणीच तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आम्हाला राज्यपालांकडे दाद मागावी लागली. राज्यपाल निश्चीतच काही तरी तोडगा काढतील.प्रतापसिंग राणे यांनीही पत्रकारांना सांगितले, की खंवटे यांनी खरोखर कुणाला धमकी दिली की नाही याची अगोदर सभापतींनी चौकशी करून घ्यायला हवी होती. सभापतींनी खंवटे यांना कारणो दाखवा नोटीस पाठवायला हवी होती. मध्यरात्री पोलीस येऊन आमदाराला अटक करतात म्हणजे काय? हे काय पोतरुगीज काळातील मोंतेरोचे राज्य आहे काय असे प्रश्न राणोंनी केले. आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत. रस्त्यावर भांडण करणारे कुणी पोर नव्हे आम्ही असे राणे म्हणाले.