शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोपटेंविरुद्ध काम केले नाही, पार्सेकरांची स्पष्ट भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:32 IST

पार्सेकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्य़ाला दिल्लीत उपस्थित राहिले.

पणजी : मांद्रे मतदारसंघात मी भाजपविरुद्ध किंवा भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्याविरुद्ध पोटनिवडणुकीवेळी काम केले नाही. सोपटे यांना मत देऊ नका असे मी एकाही कार्यकत्र्याला किंवा भाजप सदस्याला कधी सांगितले नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी आपली भूमिका मांडली.पार्सेकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्य़ाला दिल्लीत उपस्थित राहिले. तिथून लोकमतशी बोलताना पार्सेकर म्हणाले, की मी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही आणि भाजपसाठीच काम करत राहीन अशी भूमिका मी एकदा जाहीर केल्यानंतर मग मी पोटनिवडणुकीवेळी मांद्रेच्या राजकारणात लक्ष दिले नाही. मी कधी म्हापसा व कधी अन्यत्र भाजपचे काम केले. ज्यांना सोपटे यांचा राग होता, त्यांनी स्वत:हून सोपटे यांना मते दिली नाहीत. काही मते काँग्रेसला तर काही मते अपक्षाला गेली. मी मात्र सोपटे यांना मत देऊ नका असे एकाही व्यक्तीला सांगितले नाही. कुणीही दाखवून द्यावे.पार्सेकर म्हणाले, की एकदा भाजपने सोपटे यांना तिकीट दिल्यानंतर मी माझ्या शैक्षणिक संस्थांच्या कामातही बराच व्यस्त राहिलो. निवडणुकीच्या मतदानाच्या काळात किंवा मतमोजणी पूर्ण होईर्पयत सोपटे माझ्याविरुद्ध काहीच बोलले नाहीत. आता मात्र ते बोलतात. मी मांद्रे मतदारसंघात अगोदर आक्रमक भूमिका घेत मी पोटनिवडणूक लढवीन अशी हवा तयार केली होती. त्यावेळी जे चित्र निर्माण झाले होते ते सर्वाना ठाऊक आहे. जर मी निवडणूक लढलो असतो तर मांद्रेत कोणता निकाल लागला असता याची कल्पनाही अनेकांना आहे.

टॅग्स :goaगोवा