शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पणजीत महापौरांच्या मोटारीला डीजीपींनी ठोकले क्लॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 19:23 IST

महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या मोटारीने डबल पार्किंग करुन इतर वाहनांना अडथळा आणल्याच्या सबबीखाली पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्या आदेशावरुन क्लॅम्प ठोकण्यात आले.

- २00 रुपये दंड; महापौर संतप्त

पणजी : महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या मोटारीने डबल पार्किंग करुन इतर वाहनांना अडथळा आणल्याच्या सबबीखाली पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्या आदेशावरुन क्लॅम्प ठोकण्यात आले. या गुन्ह्यासाठी २00 रु पयांचा दंड भरल्यानंतर महापौरांची मोटार मुक्त करण्यात आली. राजधानी शहरात दुपारी पोलिस महासंचालकांनी स्वत: फेरफटका मारुन बेशिस्त वाहनधारकांना अशा पध्दतीने वढणीवर आणले. यातून सरकारी वाहनेही सुटली नाहीत.दिवसभरात बेशिस्त पार्क केलेल्या ५0 हून अधिक चारचाकींना क्लॅम्प ठोकून कारवाई करण्यात आल्याचे तसेच नो एंट्रीमधून वाहने हाकणाऱ्यांवरही घाऊक कारवाई केल्याचे वाहतूक पोलिस निरीक्षक ब्रॅण्डन डिसोझा यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले. ही कारवाई उद्याही चालूच राहणार आहे. बेशिस्त पार्किंगमुळे शहरात वाहतुकीची होणारी कोंडी तसेच बेदरकारपणे वाहने हाकण्याचे प्रकार वाढल्याने पोलिस महासंचालक मुक्तेश चंर यांनी वाहतूक पोलिसांना अशा वाहनधारकांवर काडक कारवाईचे निर्देश दिले होते. गुरुवारी दुपारी त्यांनी स्वत: फेरफटका मारुन पाहणी केली असता नेमकी महापौरांची मोटार रस्त्यावर मधोमध पार्क केलेली आणि इतर वाहनांना अडथळा आणत असलेली त्यांना आढळून आली. निरीक्षक ब्रॅण्डन डिसोझा यांना त्यांनी तात्काळ या मोटारीला क्लॅम्प ठोकण्याचे आदेश दिले आणि निरीक्षकांनी त्वरित ही कारवाई केली. क्लॅम्प ठोकण्याआधीच फुर्तादो हे मोटारीतून उतरुन निघून गेले होते त्यामुळे त्यावेळी वाद झाला नाहीनंतर फुर्तादो यांनी या घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना आपला चालक मोटारीतच होता त्याने मोटार पार्क केलेली नव्हती तर आपण उतरल्यानंतर मोटार मागे घेऊन तो मनपाच्या जागेत योग्य ठिकाणी ती पार्क करणार होता परंतु त्याआधीच त्याला रोखून क्लॅम्प ठोकण्यात आल्याचे ते म्हणाले. समोर असलेल्या साऊथ इंडियन बँकेच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये हे सर्व रेकॉर्ड झालेले आहे, असा दावा त्यांनी केला. आपला चालकाची जर चूक झालेली असेल तर या कारवाईबाबत आपण डीजीपींना सलाम करतो परंतु त्याचबरोबर डीजीपींनी शहरात इतर ठिकाणी होणाऱ्या डबल पार्किंगवरही कारवाई करावी, असे उपरोधिक आवाहन फुर्तादो यांनी केले आहे त्याचबरोबर शहरात वाहतकीत शिस्त आणण्यासाठी आपणच पार्किंग लागू केले. याचे स्मरणही डीजीपींना करुन दिले आहे.