शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मनात कोरोनाची धास्ती तरी, विदेशी पर्यटकांकडून गोव्यात उत्साहात होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 16:07 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळावा म्हणून गोवा सरकार सर्व प्रकारे जाहिरात करत आहे.

पणजी : मनात कोरोना विषाणूविषयी धास्ती आहे पण होळी साजरी करणो, धुलीवंदनाचा आनंद लुटणो याबाबत गोमंतकीयांच्या उत्साहावर जास्त मर्यादा आलेली नाही. विदेशी पर्यटकांनीही मंगळवारी गोव्यात होळी उत्सवात व धुलीवंदनात उत्साहात भाग घेतला. आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही प्रथमच पणजीतील रंगपंचमीत भाग घेत रंगात न्हाणो पसंत केले.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळावा म्हणून गोवा सरकार सर्व प्रकारे जाहिरात करत आहे. कोणती काळजी घ्यावी, याविषयी सल्ले देण्याची मोहीम आरोग्य खात्याच्या यंत्रणोने सुरू ठेवली आहे. लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणो टाळावे असा केंद्रीय आरोग्य मंत्रलयाचा सल्ला आहे. मात्र गोव्यात होळी उत्सवानिमित्त गावागावांत लोकांचे एकत्रीकरण जोरात सुरू आहे.

शहरातील गर्दीत थोडी घट दिसून येते पण ग्रामीण भागात मात्र लोक मोठ्या संख्येने एकत्र येऊन होळी उत्सव साजरा करत आहेत. एकमेकाच्या चेहऱ्याला रंग लावून मंगळवारी पणजीसह गोव्याच्या सर्व भागांमध्ये रंगपंचमी साजरी केली गेली. धुलीवंदनाचा आनंद पणजीसारख्या शहरात विदेशी पर्यटकांनीही लुटला.

पणजीतील आझाद मैदानावर एरव्ही धुलीवंदन साजरे करताना मोठी गर्दी होत असे. मात्र मंगळवारी सकाळी प्रारंभी गर्दी थोडी कमी दिसून आली. नंतर गर्दी वाढली. पणजीतील प्रमुख नागरिक, उद्योजक, राजकारणी आदी या गर्दीत सहभागी झाले. गोवा विद्यापीठाचे दोन विद्यार्थी तोंडाला मास्क लावून धुलीवंदनात सहभागी झाले. त्यांनी शिगमोत्सवाचा आनंद लुटला. सकाळपासूनच परप्रांतीय मजुरांनी पणजी बाजारपेठेच्या ठिकाणी एकमेकाला रंग लावून धुलीवंदन साजरे केले. दुपारी सांतइनेजसह अन्य भागांमध्ये धुलीवंदन सुरूच होते. युवकांनी मद्यपानाचाही आनंद लुटला.

एरव्ही पणजीत दरवर्षी धुलीवंदनात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर र्पीकर सहभागी होत असे. गेल्यावर्षी र्पीकर अतिशय आजारी होते व त्यामुळे पणजीतील आझाद मैदानावर होळीचा कार्यक्रम रद्द केला गेला होता. नंतरच्या काही दिवसांत र्पीकर यांचे निधन झाले. यंदाही पणजीवासियांना होळी उत्सवावेळी र्पीकरांची आठवण आलीच.

टॅग्स :corona virusकोरोनाgoaगोवा