शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

९९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; जिल्हा पंचायत निवडणुकीत आपची कामगिरी ठरली सर्वांत खराब

By किशोर कुबल | Updated: December 26, 2025 09:46 IST

रिव्होल्युशनरी गोवन्स दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर; दक्षिण गोव्यात २४ तर उत्तर गोव्यात १४ अपक्षांची अनामत रक्कम जप्त

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधी पक्षांनाही मोठे धक्के बसले आहेत. तसेच अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल करत राजकीय नशीब अजमावले, मात्र त्यांच्या पदरी पराभव पडला. विशेष म्हणजे यावेळच्या झेडपी निवडणुकीत तब्बल ९९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये आम आदमी पक्षाचे सर्वाधिक उमेदवार आहेत. त्यानंतर आरजी, काँग्रेस व अपक्षांचाही समावेश असून त्यांना अनामत रक्कम गमवावी लागली आहे.

मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एक अष्ठांशपेक्षा कमी मते मिळाली तर उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले जाते. या निवडणुकीत ३८ अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. दक्षिण गोव्यात २४ तर उत्तर गोव्यात १४ अपक्षांची अनामत रक्कम जप्त झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटानेनावेली, कोलवा व बाणावलीत अनामत रक्कम गमावली. केवळ पक्षाचे नाव पुरेसे नसून स्थानिक कामगिरी, विश्वासार्हता आणि संघटनबळ महत्त्वाचे ठरत असल्याचे चित्र दिसते.

'आप'ने या निवडणुकीत खराब कामगिरी केली. ४२ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी ३५ मतदारसंघांमध्ये डिपॉझिट गमावले. लाटंबार्सेत पक्षाच्या उमेदवार छाया नाईक यांना फक्त ६४ मते मिळाली. तोरसेंत केशव लाडको कांबळी यांना १२५, शिवोलीत दिओनिझिया ब्रिटो यांना १३५, कोलवाळमध्ये स्नेजाना परैरा यांना केवळ १९५ मतें प्राप्त झाली. दक्षिणेत बेतकी खांडोळा मतदारसंघात 'आप'चे उमेदवार शौनक कामत यांना फक्त ७५ मते मिळाली. सावर्डेत उर्मीला कालेकर यांना १५८ तर सांकवाळमध्ये आलेख नाईक यांना फक्त १६२ मते मिळाली.

काँग्रेसवर एकूण ७मतदारसंघांमध्ये डिपॉझिट गमावण्याची नामुष्की आली. उत्तर गोव्यात केरी, होंडा, नगरगाव, हरमल व शिवोली या ५ मतदारसंघांमध्ये तर दक्षिणेत बोरी व सावर्डे या २ मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी अनामत रक्कम गमावली. बोरी मतदारसंघात प्रणोती शेटकर यांना १८३४ तर सावर्डे मतदारसंघात राजेंद्र शिरोडकर यांना फक्त ५५२ मते मिळाली.

'आप'च्या ८३% उमेदवारांना दणका

आपच्या ४२ पैकी ३५ मतदारसंघांमध्ये डिपॉझिट गमावले. हे प्रमाण ८३ टक्के आहे. 'उत्तर गोव्यात नगरगाव, कळंगुट, सुकूर, लांटबार्से, शिवोली, ताळगाव, पेन्द द फ्रान्स, तोरसे, केरी, मये, रेईश मागूश, धारगळ, हणजूण, कारापूर सर्वण, सांताक्रूझ, सेंट लॉरेन्स, खोर्ली, हळदोणे, कोलवाळ, मोरजी व शिरसई या मतदारसंघांमध्ये तर दक्षिणेत सांकवाळ, बोरी, शेल्डें, राय, गिर्दोली, कुर्टी, पैंगीण, बासें, खोला, वेलिंग प्रियोळ, धारबांदोडा, बेतकी खांडोळा, रिवण व सावर्डे या १४ मतदारसंघांमध्ये डिपॉझिट गमावले.

आरजीच्या ५३ % उमेदवारांना फटका

आपनंतर आरजीचा क्रमांक लागतो. आरजीने एकूण ३० जागा लढवल्या होत्या. डिपॉझिट जप्तीचे प्रमाण ५३ टक्के आहे. पक्षाच्या उमेदवारांनी एकूण १६ मतदारसंघांमध्ये अनामत रक्कम गमावली. हे प्रमाण उत्तर गोव्यात धारगळ, रेईश मागुश, होंडा, हरमल, तोरसें, नगरगांव, हळदोणे, पेन्ह द फ्रान्स व सुकूर या ९ मतदारसंघांमध्ये तर दक्षिण गोव्यात कोलवा, राय, वेळ्ळी, धारबांदोडा, उसगांव गांजे, सावर्डे व बेतकी खांडोळा यात ७ मतदारसंघांमध्ये डिपॉझिट गमावले.

सुकूरमध्ये रिव्होल्यूशनरी गोअन्स पार्टीचे तिओतीन जॉन फेलिक्स लोबो, रेइश मागुशमध्ये आर्लेन ब्रागांझा, पेन्ह द फ्रान्समध्ये रोहन वामन धावडे तर दक्षिण गोव्यात उसगांव गांजेमध्ये नेरुपा उमेश गावडे, बेतकी खांडोळ्यात विनय विठ्ठल गावडे, रायमध्ये आंतोनेता ज्योकीम फर्नाडिस यांनी अनामत गमावली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ninety-Nine Candidates Lost Deposits; AAP Performed Worst in ZP Elections

Web Summary : District Panchayat elections saw 99 candidates lose their deposits, with AAP suffering the most. Many independents and candidates from RG and Congress also lost their deposits. AAP lost deposits in 35 out of 42 constituencies contested, highlighting poor performance and weak local presence.
टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूक 2025