पणजी : फा. बिस्मार्क डायस यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या नातेवाइकांनी नकार दर्शविला असून जोपर्यंत पोलीस या प्रकरणाचा समाधानकारक तपास करीत नाहीत, तोपर्यंत ही भूमिका कायम राहील, असे बिस्मार्क यांचे बंधू मारियो डायस यांनी मंगळवारी पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. हे प्रकरण चौकशीसाठी सीआयडी गुन्हा शाखेकडे सोपविण्याची मागणी त्यांनी केली आहे. जुने गोवे पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलेले नाही. परिस्थितीजन्य पुरावे तसेच अन्य धागेदोरे उपलब्ध असतानाही त्यादृष्टीने चौकशी झालेली नाही तसेच बिस्मार्क यांच्या कुटुंबीयांपैकी कोणाचीही जबानी घेतलेली नाही याकडे या पत्रातून लक्ष वेधले आहे. फा. बिस्मार्क हे अनेक चळवळींमध्ये होते आणि त्यांनी अनेकांशी त्यामुळे शत्रूत्वही पत्करले होते. तसे फिर्यादीत म्हटले असतानाही दुर्लक्ष करण्यात आले. चौकशीत विलंब झाल्यास पुरावे नष्ट होतील, अशी भीती व्यक्त करून हे प्रकरण विनाविलंब जुने गोवे पोलिसांकडून काढून घेऊन सीआयडीकडे सोपवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
फा़ डायस यांचा मृतहेह स्वीकारण्यास नकार
By admin | Updated: November 11, 2015 00:57 IST