लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी गोवा-सोलापूर रेलगाडी सुरू करण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देताना ते म्हणाले की, ही रेलगाडी सुरू केल्यास गोवेकरांना सोलापूर तसेच अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आदी मंदिरांनाही भेट देता येईल. या रेलगाडीची मागणी दीर्घकाळापासून आहे.
तानावडे म्हणाले की, 'गेले एक वर्ष व तीन महिन्यांच्या काळात गोव्याचे अनेक विषय मी राज्यसभेत मांडले. नुकतेच झालेले हिवाळी अधिवेशन अल्पकालीन होते. माझे केवळ नऊ प्रश्न आले. आगामी अधिवेशनासाठी लोकांकडून सूचना घेऊन प्रश्न मांडीन.'