शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जानेवारीला; न्यायालयात हजर राहण्याचे दिले आदेश

By काशिराम म्हांबरे | Updated: November 29, 2023 13:20 IST

केजरीवाल यांच्या वतिने अ‍ॅड. सुरेल तिळवे यांनी न्यायालयात त्यांच्या वतिने बाजू मांडली.

म्हापसा: दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना आज २९ रोजी न्यायालयात हजर राहण्यापासून न्यायालयाकडून सूट देण्यात आली. ५ जानेवारी २०२४ रोजी  होणाऱ्या पुढील सुनावणी दरम्यान त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आज झालेल्या सुनावणी वेळी देण्यात आले आहेत.

केजरीवाल यांच्या वतिने अ‍ॅड. सुरेल तिळवे यांनी न्यायालयात त्यांच्या वतिने बाजू मांडली. आज झालेल्या सुनावणीवेळी केजरीवाल यांना १० हजार रुपयांची हमी न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी कायदेशीरबाबीवर सध्या विचार विनीमय सुरु असून त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे. आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयातही आवाहन दिले जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. केजरीवाल यांना पाठवलेला समन्स कालच त्यांना मिळाला होता पण समन्य उशीराने प्राप्त झाल्याने ते स्वत: उपस्थित राहू शकले नाही अशी माहिती तिळवी यांनी दिली.  

२०१७ साली निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी येथील प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना काल मंगळवारी समन्स बजावला होता. लोकप्रतिनिधी कायदा आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम १७१(अ) अंतर्गत आज सकाळी १० वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रचारा दरम्यान येथील टॅक्सी स्थानकावर केजरीवाल यांनी जाहीर सभेतील आपल्या भाषणातून मतदारांना प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून मतांच्या बदल्यात पैसे स्वीकारणे मात्र मतदान फक्त आपल्याच पक्षाला देण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणात त्यानंतर तत्कालीन निर्वाचन अधिकाºयाने त्यांच्या विरोधात म्हापसा पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली होती.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालgoaगोवाCourtन्यायालय