शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नावेली ओहोळात बुडालेल्या दीपकचा मृतदेह 24 तासानंतर सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 18:44 IST

शोधकार्य करणा-यांनी हा कचरा साफ करण्यास सुरुवात केल्यानंतर या झाडीत अडकून राहिलेला मृतदेह सापडला.

मडगाव - मडगावपासून 5 कि.मी. अंतरावर असलेल्या डोंगरी-नावेली येथे सोमवारी सायंकाळी पावसाने भरलेल्या ओहोळात बुडालेल्या दीपक खत्री या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह तब्बल 24 तासानंतर मांडप पुलाजवळ सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सापडला.ज्या ओहोळात तो बुडला होता त्या ओहोळात मोठ्या प्रमाणावर झाडी असून, त्यात प्लास्टिक कचरा अडकून पडला होता. शोधकार्य करणा-यांनी हा कचरा साफ करण्यास सुरुवात केल्यानंतर या झाडीत अडकून राहिलेला त्याचा मृतदेह सापडला.ही दुर्घटना सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली होती. सोमवारी रात्री अग्निशमन दलाच्या जवानांनी आपल्या बोटमधून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्यात यश न आल्यामुळे मंगळवारी सकाळी नौदलाच्या डायव्हर्सना पाचारण करण्यात आले. एकूण सहा डायव्हर्स या शोधकामात सामील झाले होते. त्यानंतर सायंकाळी सांगेतील खासगी डायव्हर फ्रान्सिस्को बरेटो हाही शोधकार्यात सामील झाला होता. त्याशिवाय स्थानिकांनीही या शोधकार्यात भाग घेतला होता.याच ओहोळाच्या काठावर रहाणारा दीपक व त्याचे अन्य मित्र ओहोळाच्या काठी सायकल चालवत असताना सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास तोल जाऊन तो पाण्यात पडला होता. रविवारी रात्री पडलेल्या संततधार पावसामुळे हा ओहोळ भरून वाहत होता. ही दुर्घटना घडल्यानंतर सुमारे तासभराने त्या मुलांनी ही खबर बाकीच्याना दिली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचा पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने त्वरित शोधकार्यास सुरुवात केली मात्र त्याची सायकल पाण्यात सापडली मात्र तो सापडू शकला नव्हता.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी स्थानिक आमदार लुईझिन फालेरो यांनी घटनास्थळावर धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांबरोबर स्वत:ही त्यांच्या बोटवर चढून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळीही ते घटनास्थळी हजर होते अशी माहिती मडगावचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी दिली.

टॅग्स :goaगोवा