शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

गोव्यात धार्मिक प्रतिकांची मोडतोड सुरूच

By admin | Updated: July 13, 2017 15:55 IST

गोव्यामध्ये समाजकंटकांकडून धार्मिक स्थळं व प्रतिकांची मोडतोड करण्याचे प्रकार सुरूच आहेत.

ऑनलाइन लोकमत 
मडगाव ( गोवा ), दि. 13 -  गोव्यात समाजकंटकांकडून धार्मिक स्थळं व प्रतिकांची मोडतोड करण्याचे प्रकार सुरूच आहेत. बुधवारी रात्रीही दक्षिण गोव्यातील लोटली गावात अशी घटना घडली. पोलीस बंदोबस्त वाढवूनदेखील दक्षिण गोव्यात धार्मिक प्रतिकाच्या मोडतोडीचे प्रकार थांबलेले नाहीत. 
 
उलट येथून सुमारे आठ किलोमीटरवरील लोटली गावातील धार्मिक प्रतिकांची समाजकंटकांनी मोडतोड केली.  या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटले आहेत. काँग्रेसने पोलिसांना अपयश येत असल्याने धार्मिक प्रतिमांच्या मोडतोडीचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केली आहे. 
 
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, मंत्री विजय सरदेसाई यांनी तर या घटनेस जबाबदार असलेल्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देत दिसताक्षणी गोळ्या झाडायला हव्यात, असे मत व्यक्त केले आहे.  धार्मिक संस्था व राज्यपालांनी धार्मिक सलोखा जपण्याचे आवाहन केले आहे.  
 
भाजपाचे आमदार नीलेश काब्राल आणि मायकल लोबो यांनी भाजपाला घरचा अहेर दिला आहे. लोबो यांनी पोलिसांवर ठपका ठेवला आहे तर काब्राल यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा आपल्याच सरकारला दिलेला आहे.