शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

गोव्यात 1021 मद्यालये खुली करण्याचा मार्ग मोकळा, मंत्र्यांच्या समितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 20:23 IST

राज्यातील शहरांच्या बाजूने असलेल्या भागातील महामार्गाच्या जवळील एकूण 1021 मद्यालये खुली करण्याबाबतचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय बुधवारी पर्वरी येथील मंत्रालयात झालेल्या तीन मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करून द्यावे, अशी शिफारस या समितीने सरकारच्या अर्थ खात्याला केली आहे.

पणजी : राज्यातील शहरांच्या बाजूने असलेल्या भागातील महामार्गाच्या जवळील एकूण 1021 मद्यालये खुली करण्याबाबतचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय बुधवारी पर्वरी येथील मंत्रालयात झालेल्या तीन मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करून द्यावे, अशी शिफारस या समितीने सरकारच्या अर्थ खात्याला केली आहे. अबकारी खाते हे अर्थ खात्याच्या अखत्यारित येते.

नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा, नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई आणि महसूल मंत्री रोहन खंवटे या तीन मंत्र्यांची समिती ही फक्त बंद पडलेल्या मद्यालयांचा विषय हाताळण्यासाठी सरकारने अलिकडेच स्थापन केली. समितीची दुसरी बैठक बुधवारी झाली त्यावेळी कोणत्या भागात किती मद्यालये सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ानंतर बंद झाली याचा आढावा घेतला गेला. शहरांच्या बाजूने किंवा जवळ असलेल्या पर्वरी, गिरी आणि अन्य भागात असलेल्या मद्यालयांना यापूर्वी न्यायालयाचा आदेश लागू झाला व ती मद्यालये बंद झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा मद्यालयांचा प्रश्न सोडविण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या समितीने अशी 1021 मद्यालये ही क्लस्टर टाऊन ह्या विभागात येतात अशी भूमिका घेतली आणि या मद्यालयांना परवाना दिला जावा, अशी शिफारस अर्थ खात्याला करण्याचा निर्णय बैठकीत घेतला. ही क्लस्टर टाऊन जरी पंचायत क्षेत्रात येत असली तरी, त्यांचे शहरीकरण झालेले आहे व त्यातून राष्ट्रीय व राज्य महामार्ग जातात.

सर्वाधिक मद्यालये सासष्टी तालुक्यात आहेत. त्यानंतर बार्देश तालुक्याचा क्रमांक लागतो. मंत्री सरदेसाई यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले, की गोवा हे पर्यटन राज्य आहे. त्यामुळे अशा राज्यात मद्यालये बंद होणो हे परवडणारे नाही. अनेक कायदे अस्तित्वात येण्याच्या पूर्वीपासून राज्यात मद्यालये आहेत. आता फक्त तीनशे मद्यालयांचाच प्रश्न शिल्लक राहतो. या तीनशे मद्यालयांचे अर्जही स्वतंत्रपणे तीन मंत्र्यांची समिती विचारात घेईल. मोपा येथील नियोजित पीडीएच्या क्षेत्रत येणा-या मद्यालयांचे अर्जही आम्ही अजून विचारात घेतलेले नाहीत. त्याबाबतही योग्य तो निर्णय यापुढे होईल. त्यामुळे पुन्हा एकदा समितीची बैठक होणार आहे.

टॅग्स :goaगोवा