शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळी विमातळावरील निर्बंधांचा गोव्यात चार्टर विमानांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:13 IST

दाबोळी विमानतळावर नौदलाच्या निर्बंधांमुळे यंदा गोव्यात चार्टर विमानांची संख्या निम्म्याने घटेल, असे भाकित ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूर असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी) या संघटनेने केली आहे. 

 पणजी - दाबोळी विमानतळावर नौदलाच्या निर्बंधांमुळे यंदा गोव्यात चार्टर विमानांची संख्या निम्म्याने घटेल, असे भाकित ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूर असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी) या संघटनेने केली आहे. दाबोळी विमानतळ नौदलाकडे असल्याने दुपारनंतर विमानांवर निर्बंध घातले आहेत. शनिवार, रविवारी सकाळीही विमानांच्या लँडिंगला मनाई आहे. गोव्याचा पर्यटक मोसम येत्या महिन्यापासून सुरु होत आहे. पहिले चार्टर विमान येत्या रविवारी दाखल होत आहे. गोव्याला भेट देणा-या पर्यटकांमध्ये सध्या रशियन पर्यटकांची संख्या जास्त आहे. पारंपरिक युरोपीयन बाजारपेठेवरही भर दिला जात आहे. मध्य पूर्व राष्ट्रे तसेच स्कॅण्डेनेवियन देशांमधील पर्यटकांची नवी बाजारपेठ मिळविण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याला अपेक्षित यश येत असल्याचाही दावा केला जात आहे. गेल्या पर्यटक मोसमात ९८८ चार्टर विमाने गोव्यात आली. यात ६१४ रशियन व १६८ युक्रेनच्या विमानांचा समावेश आहे. स्क ँडीनेवियन राष्ट्रांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. १९८0 च्या दशकात चार्टर सेवा सुरु झाली तेव्हा युरोपियन राष्ट्रांच्या पर्यटकांवरच भर होता. परंतु गेल्या आठ-नऊ वर्षात चित्र बदलले आहे. युरोपीयन पर्यटकांची संख्या कमी झाली आणि रशियन पर्यटक वाढले. पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर सध्या जागतिक पर्यटन मेळ्यात सहभागी होण्यासाठी पॅरिसमध्ये आहेत. पॅरिसला दाखल होण्याआधी रशियात मॉस्को येथेही त्यांनी पर्यटन मेळ्यात भाग घेऊन अधिकाधिक पर्यटक रशियातून येथे यावेत यासाठी प्रयत्न केले. टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल क्षेत्रातील तेथील काही कंपन्यांशीही त्यांनी चर्चा केली. ई व्हिसाची सोय झाल्यापासून विदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. अमेरिका, संयुक्त अरब अमिरात,कझाकिस्तान, इराण तसेच पूर्व युरोपातील पर्यटकांनाही गोव्याकडे आकर्षित केले जात आहे. दुसरी बाब म्हणजे श्रीलंका, मालदिव तसेच दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांमध्ये कर कमी आहेत. गोव्यात कर जास्त आहेत त्याचाही परिणामही येथील पर्यटनावर होतो. पर्यटन खात्याने मार्केटिंग धोरण बदलायला हवे, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात.

टॅग्स :Airportविमानतळ