शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्रात ओख्खी चक्रीवादळ पोहचले, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 20:11 IST

भारतीय महासागरात कन्याकुमारीच्या नैऋत्य दिशेला चक्रीवादळ निर्माण झाले असून ते वेगाने अरबी समुद्रातून लक्ष्यद्वीप द्वीपसमूहांच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाला ओख्खी हे नावही पडले आहे. 

पणजी: भारतीय महासागरात कन्याकुमारीच्या नैऋत्य दिशेला चक्रीवादळ निर्माण झाले असून ते वेगाने अरबी समुद्रातून लक्ष्यद्वीप द्वीपसमूहांच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाला ओख्खी हे नावही पडले आहे. तिरुअनंतपुरमच्या दक्षिणेला ७० किलोमीटरवर तर कन्याकुमारीच्या नैऋत्य दिशेला तितक्याच अंतरावर ओख्खी चक्रीवादळ पोहोचले आहे. ताशी ९० ते १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने किना-याच्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत हे  चक्रीवादळ सरकत असल्यामुळे केरळ किनारपट्टी व तामिळनाडू किनारपट्टीवर वादळी वा-यासह जोरदार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. ओख्खी चक्रीवादळाची गती गुरूवारी रात्री ११.३० वाजता ताशी ९० ते १०० किलोमीटर इतकी होती. शुक्रवारी ते आणखी गतीमान होऊन ताशी ११० ते १२० किलोमीटर वेग धरू शकते. तर शुक्रवारी मध्यरात्री आणि शनिवारी सकाळी हे चक्रीवादळ सर्वात अधिक धोकादायक ठरू शकते. ताशी १३० किलोमीटर पर्यंतत्याचा वेग वाढू शकतो असे हवामान खात्याच्या गुरूवारच्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे. गोव्यात या वादळाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार नसला तरी जोराचा वारा सुटू शकतो. तसेच पावसाच्या सरीही कोसळू शकतात. समुद्र खवळलेला असल्यामुळे मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाणे धोकादायक ठरू शकते. हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :goaगोवा