शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सायबर पोलीस फेल, गुन्हेगार पास!;  अवघ्या ३० टक्के प्रकरणांचाच छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 02:04 IST

७० टक्के प्रकरणांत तपास रखडला

वासुदेव पागी पणजी : सायबर गुन्हेगार आणि तपास यंत्रणा यातील लढाईत गुन्हेगारच शिरजोर होत असल्याचे आतापर्यंतचे गुन्हे आणि तपास काम याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अवघ्या ३० टक्के प्रकरणांचाच आतापर्यंत छडा लागला आहे. ७० टक्के प्रकरणात अद्याप आरोपपत्र दाखल करण्याएवढे तपास काम झालेले नाही.

शालेय अभ्यासक्रमात उत्तीर्ण टक्केवारी ही ३५ टक्के असते. तपास यंत्रणांच्या कामाचे मूल्यांकन करताना ही लागू केल्यास गोव्याचा सायबर विभाग हा गुन्ह्यांच्या तपास कामांसाठी नापास ठरत आहे. एकूण ८७ प्रकरणांपैकी ७८ प्रकरणात तपास पूर्ण झाल्याचा दावा सायबर गुन्हा विभागाकडून केला आहे. परंतु अवघ्या २ प्रकरणात आरोपपत्रे दाखल केली आहेत. हे प्रमाण ३० टक्के आहे.

वर्ष २०१४ पासून २०१८ वर्षाच्या समाप्तीपर्यंत सायबर गुन्ह्यांची ८७ प्रकरणे नोंदली गेली होती. त्यातील केवळ २६ प्रकरणाचा छडा लागला असे म्हणता येईल. छडा लागला म्हणजे या प्रकरणात काही तरी तथ्य आहे व पुरावे आहेत म्हणून न्यायालयात आरोपपत्रे दाखल केली आहेत. असे असले तर अद्याप एकालाही दोषी घोषित करण्यात यश आलेले नाही. मागील वर्षीच म्हणजे वर्ष २०१८ मध्येच ३२ गुन्हे नोंदविले होते. त्यातील केवळ ९ प्रकरणात आरोपपत्रे दाखल केली आहेत तर ११ प्रकरणे पुराव्यांच्या अभावी बंद करावी लागली.वर्ष २०१९ मधील गुन्ह्यांचा एकाही प्रकरणाचा छडा लागलेला नाही.

विभाग व्हावा लवकर सुसज्जसायबर विभाग सुसज्ज नसल्यामुळे तपासकामात मोठा अडथळा येत आहे. सरकारने नवीन सायबर विभाग सुसज्ज करण्यासाठी कंत्राट प्रक्रिया सुरू केली आहे. प्रशिक्षण आणि सुसज्जीकरण अशा स्वरूपाच्या या निविदा आहेत. ही प्रक्रिया लवकर पार पाडून लवकर पोलिसांना सुसज्ज सायबर विभाग मिळाल्यास सायबर गुन्हेगारांचा छडा लावण्याच्या दृष्टीने आणि किमान अशा गुन्हेगारांना धाक बसविण्याच्या दृष्टीने ती महत्त्वाची गोष्ट ठरेल.

ज्येष्ठ नागरिक लक्ष्यया पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने सायबर गुन्ह्यांविषयी जागृती करण्याचे काम मात्र चांगल्या पद्धतीने सुरू ठेवले आहे. सायबर गुन्हेगार हे विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करीत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या विषयी माहिती देण्यासाठी पोलिसांकडून उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम