शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चलनातील नोटा चोरल्या, नोटबंदीतील तिथेच ठेवल्या; पोलिसांपुढे कबुली, कोर्टात म्हणाला 'तो मी नव्हेच'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 18:00 IST

सुरुवातीला तपासाला सहकार्य न करणारा मुजाहीद हा पोलिसांच्या हातचा 'प्रसाद' खाल्ल्यानंतर पोपटासारखा बोलाया लागला आहे.

पणजी: पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात चोरी करणारा संशयित वकील मुजाहीद शेख याने चोरी करताना कोणतीही घाई वगैरे केली नाही, असे पोलिसांना तपासात आढळले आहे. आपण चोरी नव्हे तर एखादे कार्यालयीन कामच करीत आहे, अशा थाटात भरपूर वेळ घेऊन त्याने मुद्देमाल लंपास केला. विविध प्रकरणात जप्त झालेली रोख रक्कम तेथे होती. मात्र, मुजाहीदने नोटबंदीमध्ये चलनातून काढून टाकण्यात आलेल्या जुन्या नोटा वेचून बाजूला काढून ठेवल्या आणि सध्या चलनात असलेल्या ४ लाख ७५ हजारांच्या नोटा तो घेऊन गेला.

न्यायालयातील चोरी प्रकरणात संशयित मुजाहीद शेख याने चोरलेल्या रकमेतील ४.७५ लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना अखेर यश आले. सुरुवातीला तपासाला सहकार्य न करणारा मुजाहीद हा पोलिसांच्या हातचा 'प्रसाद' खाल्ल्यानंतर पोपटासारखा बोलाया लागला आहे.

आपण चोरलेली रक्कम कुठे ठेवली हेही त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी वाळपईत जाऊन त्याच्या कार्यालयातून ती रोकड जप्तही केली. चोरी केल्यावर सील करून ठेवलेला मुद्देमाल कापून त्याने त्यातील पैसे काढल्याचे त्याने जबानीत सांगितले आहे. 

याशिवाय, मुजाहीदने आणखीही काही ठिकाणी चोऱ्या केल्या असण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती काढून घेण्याचे प्रयत्न पोलिस करीत आहेत. याप्रकरणी अद्याप तपास सुरू आहे.

संशयित म्हणतो... 'तो मी नव्हेच'

दरम्यान, संशयित मुजाहीद शेख हा वकील असल्यामुळे पोलिसांच्या तावडीत सापडल्यावरही कसे वागावे व कसे बोलावे, याची खबरदारी तो घेताना दिसत आहे. पोलिसांचा मार चुकविण्यासाठी पोलिस कोठडीतील चौकशीवेळी तो सर्व काही सांगून टाकतो. कशी चोरी केली, किती चोरी केली व चोरीचा माल कुठे ठेवला याची सर्व माहिती त्याने पोलिसांना दिली. परंतु न्यायालयात त्याने 'तो मी नव्हेच' अशी भूमिका घेतली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा