शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

Coronavirus: गोव्यात कर्फ्यू जरी किंचित शिथिल; पण पुढील काळ धोक्याचा- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 22:57 IST

रविवारी सायंकाळी सगळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर गोमंतकीयांची गैरसोय

पणजी : गोव्यात कर्फ्यू जरी किंचित शिथिल केला गेला तरी, पुढील आठ दिवस हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप धोक्याचे आहेत असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी गोमंतकीयांना दिला. सकाळी सहा ते अकरा या वेळेतच भाज्या, मासे, दूध, फळे, धान्य खरेदीची मुभा सरकारने गोमंतकीयांना दिली आहे. उद्या बुधवारपर्यंत कर्फ्यू कायम आहे, फक्त काही शिथिलता दिली गेली आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.गोमंतकीयांनी कडधान्य, भाज्या, फळांचा साठा केला नव्हता. त्यामुळे रविवारी सायंकाळी सगळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर गोमंतकीयांची गैरसोय झाली. मात्र आरोग्याच्या दृष्टीने थोडी गैरसोयही सहन करावी लागेल. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सकाळी सचिवालयात मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सर्व मंत्र्यांनी त्यात सहभाग घेतला. येत्या दि. 31 मार्चपर्यंत गोमंतकीयांनी खूप काळजी घ्यावी लागेल. बेफिकीर राहून मुळीच चालणार नाही व त्यामुळे रस्त्यावर तीनपेक्षा जास्त गोमंतकीयांनी जमू नये व अकारण बाजारपेठ किंवा इतरत्र जाऊ नये, असे आवाहन सावंत यांनी केले.मंगळवार दि. 24 व बुधवार 25 रोजी सकाळी सहा ते अकरा या वेळेत गोमंतकीयांनी दुकानांमधून भाज्या, धान्य, फळे, मासे, मांस वगैरे खरेदी करावे. छोटी सुपर मार्केट्स, किराणा मालाची दुकाने पाच तास खुली राहतील. लोकांनी गर्दी टाळावी. प्रत्येकाने स्वत:ची व स्वत:च्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. रस्त्यावर फिरू नये. तिघांपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमल्यास जमावबंदीचे उल्लंघन होईल. गुढी पाडवा देखील कुणी साजरा करू नये. तसेच मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज म्हणू नये. हिंदू, ख्रिस्ती किंवा मुस्लिमांचे कुठेही एकत्रिकरण दिसले तर पोलीस कारवाई करतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.या सेवा सुरू राहतील राज्यात काही वेळासाठीच बँका सुरू राहतील. एटीएम सुरू राहतील. सरकारी खात्यांमध्ये गरजेचे तेवढेच कर्मचारी उपस्थित असतील. वीज, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, पालिका सेवा, सुलभ शौचालये, जनावरांचे दवाखाने, टपाल, प्रसार माध्यमे, अग्नी शामक यंत्रणा, पोलिस, कायदा व सुव्यवस्था राखणा:या सर्व यंत्रणा, टेलिकॉम, तुरुंग सुरू राहील. त्यांना बंदीतून वगळले गेले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या