शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

खनिज खाणप्रश्नी अध्यादेश जारी करण्याबाबत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 17:49 IST

गोव्यातील खनिज खाणी नव्याने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारला अध्यादेश जारी करण्यास भाग पाडण्याची भूमिका गोव्यातील काही मंत्री घेऊ लागले आहेत.

पणजी : गोव्यातील खनिज खाणी नव्याने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारला अध्यादेश जारी करण्यास भाग पाडण्याची भूमिका गोव्यातील काही मंत्री घेऊ लागले आहेत. याबाबत सोशल मिडियावरून टीकेचा सूर सुरू झाला आहे.खाणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्यात अर्थ नाही हे गोवा सरकारमधील विविध मंत्र्यांना पटू लागले आहे. गोव्यातील सर्व खनिज लिजेसची मालकी 2020 सालापर्यंत तरी पूर्वीच्याच खाण कंपन्यांकडे कायम ठेवली जावी म्हणून केंद्र सरकारने वटहुकूम जारी करून एमएमडीआर कायदा दुरुस्त करावा अशा प्रकारचा विचार आता गोवा सरकारमधून पुढे येऊ लागला आहे. मंत्री तथा भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी हा विचार उघडपणो बोलून दाखवला आहे.गेल्या 7 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोवा फाऊंडेशनच्या याचिकेवर निवाडा देताना गोव्यातील सर्व खनिज लिजेस रद्दबातल ठरवली. त्यामुळे 15 मार्चपासून गोव्यातील सगळा खनिज खाण व्यवसाय बंद झाला. यावर उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करूया असे गोवा सरकारने अगोदर ठरवले होते. सल्ल्यासाठी हा विषय देशाचे माजी अ‍ॅटर्नी जनरल हरिष साळवे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. साळवे यांनी नुकताच गोवा सरकारला सल्ला दिला. एखाद्या राज्याची आर्थिक स्थिती कोलमडली हा फेरविचार याचिकेचा मुद्दा होऊ शकत नाही व खाणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करून फारसे काही प्राप्त होऊ शकत नाही अशा अर्थाचे मत साळवे यांनी गोवा सरकारला कळविल्यानंतर सरकारमधील मंत्र्यांनी आता वेगळा सुरू लावला आहे. फेरविचार याचिका सादर न करता आम्ही केंद्र सरकारला वटहुकूम जारी करण्याची विनंती करूया असे मंत्री सरदेसाई म्हणाले.सरकारमधील दुसरे एक ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनाही अध्यादेश काढण्याबाबतची विनंती योग्य वाटते. आम्ही गेल्या आठवडय़ात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटलो होतो. त्यावेळी शहा यांनी गोव्यातील खनिज खाणी सुरू व्हाव्यात म्हणून कोणताही पर्याय स्वीकारण्यास केंद्र तयार असेल असे आम्हाला सांगितले होते, असे डिसोझा म्हणाले. बेकायदा खनिज खाणींविरुद्ध लढणारे गोवा फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. क्लॉड अल्वारीस म्हणाले, की सरकार वटहुकूम काढू पाहत असेल तर तो खाण कंपन्यांच्या हितासाठीच, अन्य लोकांसाठी नव्हे. खाण कंपन्या कामगार कपात करत असताना कंपन्यांचा पुळका सरकारला का? सरकारने महामंडळ स्थापन करून खाणी चालवाव्यात. दरम्यान, सोशल मिडियावरून सरकारवर टीका सुरू झाली आहे. केंद्र सरकारने अध्यादेश जारी करू नये. गोव्यातील खनिज खाणींचा लिलाव पुकारावा अशी मागणी नेटीझन्स करू लागले आहेत.

टॅग्स :goaगोवा