शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांमध्ये बोगस ओबीसींची निर्मिती, भंडारी समाजाकडून आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 20:29 IST

परप्रांतीय मजुर येतात आणि येथे ते आपले आडनाव बदलून घेतात व ओबीसी बनतात.

पणजी - परप्रांतीय मजुर गोव्यात येतात आणि येथे ते आपले आडनाव नाईक असे बदलून घेतात व ओबीसी बनतात. या गंभीर प्रकाराला आक्षेप घेणारे निवेदन गोमंतक भंडारी समाजाने सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले. तसेच आडनावे अशी बदलण्याच्या प्रकाराला समाजाने तीव्र आक्षेप घेतला व मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून कायदा दुरुस्त करावा अशी मागणी केली.राज्यातील तीन तालुक्यांमध्ये अलिकडे असे मोठय़ा प्रमाणात आढळून येते की, या तीन तालुक्यांमध्ये येणारे परप्रांतीय मजुर येथे कायमस्वरुपी वास्तव्य करण्यासाठी आडनावे बदलतात. बहुतांश लोक नाईक असे आपले आडनाव बदलून घेतात. हे लोक मग व्यवसायिक शिक्षण, सरकारी नोक-या यात असलेल्या आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी तसेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी भंडारी म्हणून किंवा ओबीसी म्हणून प्रमाणपत्रही प्राप्त करतात. हा प्रकार आता खूप व्यापक व खूप गंभीर वळणावर पोहचल्याने भंडारी समाजाने सरकारचे लक्ष याकडे वेधले असल्याचे दिसून आले.समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, ज्येष्ठ पदाधिकारी देवानंद नाईक तसेच दत्तप्रसाद नाईक, महानंद अस्नोडकर, किशोर अस्नोडकर, दयानंद मांद्रेकर आदींनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 1990 सालचा द गोवा चेंज ऑफ नेम्स अॅण्ड सरनेम्स हा कायदा दुरुस्त केला जावा, अशी मागणी समाजाने निवेदनातून केली आहे. परप्रांतांमध्ये ज्या मजुरांचा जन्म झाला, त्यांची नावे बदलण्यास नव्या दुरुस्तीद्वारे प्रतिबंध करावा, अशी मागणी समाजाने केली आहे. बार्देश, मुरगाव आणि सासष्टी या तीन तालुक्यांमध्ये आडनावे बदलण्याचे प्रकार जास्त घडतात. जर कुणीही परप्रांतीय आपले आडनाव नाईक असे बदलून घेण्यासाठी अर्ज घेऊन आले तर सरकारी खात्याने ते नाव गोमंतक भंडारी समाजाला कळवावे. गोमंतक भंडारी समाज बांधवांच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जायलाच हवी, अशी मागणी समाजाने केली आहे. 

टॅग्स :goaगोवाOBC Reservationओबीसी आरक्षण