शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना दणका, फाइल अडविल्यास व्हाट्सअपवर करा तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 21:22 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून क्रमांक जाहीर

पणजी : सरकारी कार्यालयात कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने फाइल अडविल्यास तसेच भ्रष्टाचारासाठी सतावणूक होत असल्यास संबंधित कर्मचारी तसेच खात्याविरुद्ध सार्वजनिक गाऱ्हाणी विभागाकडे आता थेट व्हाट्सअपवर अथवा ईमेलवर किंवा कॉल करूनही तक्रार करता येईल. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी व्हाट्सअप क्रमांकही जाहीर केला आहे.

सार्वजनिक गाऱ्हाणी विभाग सरकारने सक्रिय केला असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दक्षता सप्ताहाच्या कार्यक्रमात कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांच्या काळात या विभागाकडे ३0६ तक्रारी आल्या आणि त्यातील ७0 टक्के तक्रारींना न्याय देऊन आम्ही त्या सोडविल्या. कुठल्याही सरकारी कार्यालयात शासकीय कामाच्या बाबतीत कर्मचाऱ्यांकडून गैरवागणूक मिळाल्यास अथवा कोणी पैसे मागत असल्यास पणजी येथे उद्योग भवनात वरील विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष तक्रार सादर करण्याची सोय आहे. आता या व्यतिरिक्त 8956642400 या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा 9319334335 या क्रमांकावर कॉल करून तक्रार करता येईल. या विभागाकडे तक्रार आल्यानंतर ती संबंधित खातेप्रमुखाकडे पुढील कारवाईसाठी पाठवली जाईल.

आठ ते नऊ अधिकाऱ्यांना निलंबित केले : मुख्यमंत्रीमुख्यमंत्री म्हणाले की, सरकारी कार्यालयांमध्ये कामे घेऊन येणाऱ्यांना गैरवागणूक देणाऱ्या किंवा भ्रष्टाचारासाठी सतावणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. माज्या चार वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये मी आठ ते नऊ अधिकाऱ्यांना निलंबित केले. दहा ते बारा अधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी होत्या. मुख्यमंत्री म्हणाले की, काही वेळा निलंबनाची कारवाई करताना मला वाईट वाटते परंतु खात्यामध्ये शिस्त आणण्यासाठी अशी कठोर कारवाई करणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत