शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाकडून खनिज वाहतूक बंदीचा आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 22:04 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही खनिज वाहतुकीस कोणाच्या जबाबदारीवर परवानगी दिली याची माहिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने सरकारला खडसावले आहे.

पणजी  - सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही खनिज वाहतुकीस कोणाच्या जबाबदारीवर परवानगी दिली याची माहिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने सरकारला खडसावले आहे. गोवा फाउंडेशनतर्फे दाखल करण्यात आलेली अवमान याचिका दाखल करून घेऊन खनिज वाहतूक ताबडतोब बंद करण्याचा आदेश खंडपीठाने दिला. सर्वोच्च न्यायालयाने १५ मार्च नंतर सर्व खनिज व्यवहार बंदीचा आदेश दिला असतानाही गोव्यात खनिज वाहतूक चालू ठेवण्यास खाण खात्याने परवानगी दिल्यामुळे गोवा फाउंडेशनतर्फे खंडपीठात दाखल केलेल्या अवमान याचिकेची खंडपीठाने गंभीर दखल घेतली. बुधवारी याचिकेवर सुनावणी सुरू झाली तेव्हा याचिकादाराच्यावतीने युक्तीवाद करताना अ‍ॅड. नॉर्मा आल्वारीस यांनी माईन्सकेप  अँड कादर ओरस् प्रायव्हेट लिमिटेड, सेझा गोवा आणि वेदांता कंपनीकडून खानिज वाहतूक सुरू असल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यासाठी खाण खात्याकडून रीतसर परवानगीही देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग असल्याचा दावा आल्वारीस यांनी केला. आल्वारीस यांच्या युक्तीवादाशी प्रतिवाद करताना अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांनी वाहतूक सुरू असलेला खनिज डंप हा खाणलिजाच्या बाहेर टाकलेला असल्याचे सागंतिले. तसेच १५ मार्चपूर्वी त्याचे उत्खनन करण्यात आले होते आणि त्यासाठी कंपनीकडून  रॉयल्टीही फेडलेली आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कायद्यावर बोट ठेवताना खनिज डंप खाण लिजक्षेत्राच्या बाहेर टाकण्यास परवानगी नसल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशात तसे स्पष्ट करण्यात आले असल्यामुळे या दोन्ही आदेशांचाही भंग करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. केवळ टाकाऊ खनिज (रिजेक्ट्स) टाकता येतात, पण कंपनीकडून खनिजेच डंप केल्याचे त्यांनी न्यायालयाच्या नजरेस आणून दिले.या प्रकरणातील पुढील सुनावणी १८ एप्रील रोजी ठेवण्यात आली असून तोपर्यंत खनिज वाहतूक बंद ठेवण्याचा आदेश खंडपीठाने दिला. तसेच या प्रकरणात सरकारकडून जबाबदारी निश्चित करणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याचाही आदेश दिला.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या