शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गोवा डेअरी प्रकरणात न्यायालय गुरुवारी देणार निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 17:48 IST

गोवा डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या चौकशीचा आदेश देण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डेअरीतील कागदपत्रे सहकार निबंधकाकडून ताब्यात घेण्यात आली आहेत.

पणजी: गोवा डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या चौकशीचा आदेश देण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डेअरीतील कागदपत्रे सहकार निबंधकाकडून ताब्यात घेण्यात आली आहेत. दरम्यान या प्रकरणातील न्यायालयीन लढाई संपली असून गुरुवारी निवाडा सुनावला जाईल.आपल्या निलंबनाच्या सहकार निबंधकाच्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी न्यायालयात गेलेले व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत यांच्या याचिकेवर सतत तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. परंतु खंडपीठाकडून स्थगितीचा अंतरिम आदेशही दिला नाही. मंगळवारच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांनी डेअरीच्या कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात घेण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला अनुसरून बुधवारी त्वरित कारवाई झाली आणि डेअरीची कागदपत्रे सहकार निबंधकाकडून ताब्यात घेण्यात आली. नवसो सावंत यांना भ्रष्टाचार प्रकरणात निलंबित करून त्याची चौकशी करण्याचा आदेश सहकार निबंधकानी दिला होता. तसेच डेअरीवर प्रशासक नेमण्यात आला होता. प्रशासकाने अद्याप डेअरीचा ताबा घेतलेला नाही.द्विसदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीच्यावेळी सावंत यांच्यासाठी युक्तिवाद करताना अ‍ॅड. सरेश लोटलीकर यांनी सहकार निबंधकाला व्यवस्थापकीय संचालकांना निलंबित करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. सरकारने डेअरीला निधीही दिलेला नाही आणि सरकारचे डेअरीत शेअर्सही नाहीत. त्यामुळे निलंबनाचा आदेश हा पूर्णत: बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर प्रतिवाद करताना सरकारी अभियोक्ते प्रवीण फळदेसाई यांनी सहकार निबंधकाची कारवाई ही सहकार कायद्याच्या तरतुदी अंतर्गतच झाल्याचे सांगितले. या प्रकरणात सुनावणी पूर्ण झाली आहे. डेअरीच्या इतर चार संचालकांनी सादर केलेल्या प्रशासक नेमण्याच्या याचिकेवरही सुनावणी पूर्ण झाली आहे. गुरुवारी खंडपीठ निवाडा सुनावणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालय