शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या शिक्षणाबाबत देशाने गोव्याचा आदर्श घ्यावा- राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 17:39 IST

मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत गोव्याचा आदर्श देशाने घ्यावा, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोवा विद्यापीठात आयोजित पदवीदान सोहळ्यात बोलताना काढले.

पणजी: मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत गोव्याचा आदर्श देशाने घ्यावा, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोवा विद्यापीठात आयोजित पदवीदान सोहळ्यात बोलताना काढले. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, वरुण साहनी व इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.या सोहळ्यात एकूण ९ हजार यशस्वी विद्यार्थ्यांना डॉक्टरेट, पदव्युत्तर प्रमाणपत्रे, पदव्या व पदविका देण्यात आल्या. विविध अभ्यासक्रमात सुवर्ण पदक पटकावलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के मुली आहेत. एकूण ६७ सुवर्णपदकांपैकी ४१ सुवर्ण पदकांच्या मानकरी या मुली आहेत. आपल्या भाषणातून या आकडेवारीचा विशेष उल्लेख करून राष्ट्रपती म्हणाले की, ही केवळ गोवा विद्यापीठासाठीच आणि गोव्यासाठीच अभिमानास्पद गोष्ट नाही तर संपूर्ण देशासाठी गौरवास्पद आहे. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहीत करणे म्हणजे काय ते इतर राज्यांनी गोव्याकडून शिकावे. या कामगिरीचा उल्लेख त्यांनी गेम चेंजर या शब्दात केला. राष्ट्रपती झाल्यानंतर कोविंद यांची ही पहिलीच गोवा भेट होती.गोवा विद्यापीठातील पोर्तुगीज व लुसोफोन अभ्यास विभाग आणि समुद्र विज्ञान विभागांचे कौतुक करताना त्यांनी या विषयात खूप संधी असल्याचे सांगितले. गोवा विद्यापीठातील संशोधनात्मक उपक्रमासाठीच्या व्हिजिटिंग अद्यापन हा प्रकार संपूर्ण देशात वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगून इतर विद्यापीठांनी यापासून शिकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.राज्यपालांच्या विद्यार्थ्यांना शपथाराज्यपाल मृदुला सिन्हा यांनी यावेळी आपले भाषण संपविण्यापूर्वी विद्यार्थ्यांना काही शपथा दिल्या. विद्यार्थ्यांनी हात वर करून शपथा घेतल्या. शपथा अशा: आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नका, विवाह अनिवार्य नाही, परंत आवश्यक आहे. विवाह केल्यानंतर एकमेकांना सन्मान देत जगा, कोणत्याही युवतीवर किंवा महिलेवर अत्याचार होवू देणार नाही, नशा करणार नाही, अस्वच्छता करणार नाही व करू देणार नाही.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद