शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

Coronavirus : परदेशात अडकले हजारो गोमंतकीय खलाशी, घरच्यांना लागला घोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 05:23 IST

सुमारे चाळीस हजार गोमंतकीय जहाजांवर काम करतात. अशा जहाजांवर काम करणे हा गोवेकरांसाठी पूर्वीपासूनचा रोजगाराचा पर्याय आहे.

मडगाव ( जि. दक्षिण गोवा) : कोरोना विषाणूमुळे अनेक क्रुझ कंपन्यांनी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी परदेशात हजारो गोमंतकीय खलाशी अडकले आहेत. ते घरी कधी परतणार याचा संबंधित कुटुंबीयांना घोर लागलेला आहे. सुमारे चाळीस हजार गोमंतकीय अशा जहाजांवर काम करतात.अशा जहाजांवर काम करणे हा गोवेकरांसाठी पूर्वीपासूनचा रोजगाराचा पर्याय आहे. गोमंतकीय पीएनओ, वायकिंग, एमएससी, आरसीसीएल, कोस्टा, आयदा अशा नामांकित क्रुझ कंपन्यांत काम करतात. या सर्वच कंपन्यांनीआपले कामकाज दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाआहे.स्थिती सुधारली तरच या कंपन्या सुरू होणार आहेत. जर हा कालावधी वाढला तर अनेक गोवेकरांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे.नवरदेव परदेशात... लग्न कसे करायचे ?काही तरुण परदेशात अडकून पडल्याने त्यांची लग्नेही खोळंबलेली आहेत. सांगे-केपे परिसरात अशी तीन प्रकरणे आहेत. इतर ठिकाणीही अशी प्रकरणे असू शकतात.कुडचडे येथील युवक कुवेतमध्ये अडकल्याने लग्नाचा मुहूर्त तो गाठू शकेल का, या चिंतेने त्याच्या कुटुंबीयांना ग्रासले आहे. केपेतील एका कुटुंबालाही लग्न लांबणीवर टाकावे लागले. कारण जहाजावर काम करणारा नवरदेव मस्कत विमानतळावर अडकून पडला आहे. सावर्डेतील एका कुटुंबावरही अशीच पाळी आली आहे.तर कंपन्या दिवाळखोरीत?दक्षिण अमेरिकेतच दोन हजारांच्या आसपास गोवेकर खलाशी अडकले आहेत. कामच नसल्याने शेकडोंच्या संख्येने गोवेकर गोव्यातही परतू लागलेत. जर परिस्थिती सुधारली नाही तर कित्येक क्रुझ कंपन्या दिवाळखोरीत जाऊ शकतात. तसे झाल्यास हजारो गोवेकरांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. कित्येकांनी कर्ज काढून या नोकºया स्वीकारलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात स्थिती गंभीर होऊ शकते.- डिक्सन वाझ, अध्यक्ष,गोवन सी फेअरर्स असोसिएशन

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना