शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : '...अन्यथा आमच्या शवपेट्या आणायची वेळ तुमच्यावर येईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 16:46 IST

CoronaVirus : जहाजावर एकूण 190 भारतीय खलाशी असून त्यापैकी 65 गोमंतकीय आहेत.

मडगाव: गेल्या 40 दिवसांपासून भारतीय समुद्रात असलेले मारेला डिस्कवरी हे जहाज उद्या( दि.२२) पुन्हा युरोपला जाण्यासाठी निघणार आहे. त्यामुळे या जहाजावरील गोमंतकीय खलाशांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. आम्हाला खाली उतरविण्याचा निर्णय एका दिवसात घ्या, अन्यथा आमच्या शवपेट्या घरी आणण्याची वेळ तुमच्यावर येईल, असा इशारा या खलाशांनी दिला आहे.

या जहाजावर एकूण 190 भारतीय खलाशी असून त्यापैकी 65 गोमंतकीय आहेत. 40 दिवसांपूर्वी हे जहाज कोची बंदरात आले होते, त्यानंतर ते मुंबईला हलविण्यात आले. 40 दिवस उलटूनही भारतीय खलाशांना खाली उतरविण्या संदर्भात कसलाही निर्णय न झाल्याने आता ते परत युरोपात नेण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

या निर्णयामुळे धीर खचलेल्या गोमंतकीय खलाशानी एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून आपली व्यथा मांडली आहे. या व्हिडिओत ते म्हणतात, अजून आमची तब्येत उत्तम आहे. पण आम्हाला कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या युरोपात घेऊन गेल्यास स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरित एका दिवसात काय तो निर्णय घ्या, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रश्नात केंद्र सरकारने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली असून त्यांनी केंद्रीय मंत्री  श्रीपाद नाईक यांच्याकडे यासंदर्भात चर्चा केली आहे.

दुसरीकडे, जर या खलाशांना मुंबई बंदरावर उतरवता येत नसेल तर त्यांना मुंबईत असलेल्या कर्णिका या जहाजावर हलवावे. पण त्यांना कुठल्याही परिस्थिती युरोपात परत पाठवू नये, अशी मागणी सीफेरर असोसिएशन संघटनेने  केली आहे. या खलाशांना मुंबईतच उतरवून त्यांना तिथेच क्वारंटाइन करून ठेवावे, अशी मागणी काही जणांनी केली आहे, तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या मुंबईत त्यांना ठेवण्यापेक्षा त्यांना आधी गोव्यात आणावे आणि नंतर त्यांना गोव्यातच विलगीकरण कक्षात ठेवावे, अशी मागणीही होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा