शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

गोव्यात 6 दिवसात कोविड संक्रमितांची संख्या चौपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 20:53 IST

रुग्णालयावर ताण; सुविधा अपुऱ्या पडण्याची भीती

- वासुदेव पागी

पणजीः गोव्यात मांगोरहील - वास्कोतील कोविड रुग्णसंख्येच्या उद्रेकानंतर एकाचवेळी राज्यातील 6 भागातून कोविड रुग्णांचा मडगावच्या कोविड इस्पितळात ओघ सुरू झाला असून केवळ 6 दिवसात संक्रमितांची संख्या चार पटीने वाढली आहे. यामुळे कोविड इस्पितळावरील ताण वाढत चालला असून उपलब्ध साधन सुविधा अपुऱ्या ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. हा ओघ असाच चालू राहिल्यास 200 रुग्णांची व्यवस्था असलेल्या इस्पितळावर क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण हाताळण्याची वेळ येणार आहे. 

अनिश्चिततेच्या या काळात एक मोठी दिलासादायक गोष्ट म्हणजे गोव्याच्या कोविड इस्पितळाची नेत्रदीपक कामगिरी. महामारी सुरू झाल्यापासून आतापयर्यंत आढळलेल्या सर्वच कोविड संसर्गितांवर या इस्पितळात उपचार करण्यात आले आहेत आणि रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकाही संसर्गित या इस्पितळात प्राणास मुकलेला नाही. त्यामुळे ज्याचा सार्थ अभिमान धरावा असे हे मडगावचे कोविड इस्पितळ ठरले आहे. 

जोपर्यंत इस्पितळात दाखल रुग्णांची संख्या मर्यादीत राहील तोपर्यंत त्यांच्याकडे पुरेसे लक्ष देणे तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शक्य होईल, परंतु  संसर्गीत रुग्णांची संख्या ही प्रमाणा बाहेर जाईल तेव्हा त्याचा परिणाम उपचारांवरही होणे स्वाभाविक आहे. मागील आठ दिवसाची संसर्गितांची आकडेवारी पाहाता 200 खाटांची व्यवस्था ही कमी पडण्याची पूर्ण शक्यता असल्याची माहिती कोविड इस्पितळातील एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली. 

दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संसर्गितांच्या संख्येत आढळून आलेली वाढ ही अधिक चाचण्यांचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. परंतु वाढ झपाट्याने होताना दिसत आहे हे वास्तव आहे. 

इस्पितळात चौपट एकूण अडीचपटआरोग्य खात्याच्या अधिकृत माहितीनुसार 31 मे रोजी एकूण संसर्गितांची संख्या 71 इतकी होती तर बरे होवून घरी गेल्यानंतर प्रत्यक्ष कोविड इस्पितळात दाखल असलेले 27 रुग्ण होते. नंतरच्या 6 दिवसात एकूण संसर्गित झाले 196 आणि प्रत्यक्ष दाखल असलेले झाले 131.  म्हणजेच केवळ सहा दिवसात  कोविड इस्पितळात दाखल असलेल्या संसर्गीत रुग्णात चौपटीने तर एकूण रुग्णसंख्येत अडीच पटीने वाढ झाली आहे. 

6 भागातून संक्रमितांचा ओघया आठवड्यापासून कोविड इस्मांपितळात येणाऱ्या रुग्णांचा मांगोर हील वास्को परिसर हा मोठा स्रोत राहिला आहे. त्यानंतर मालभाट - मडगाव, सांगे, गुळेली, दोनापावला या भागातून संक्रमित येऊ लागले आहेत. शिवाय सर्व चेक नाके आणि रेल्वे स्थानकांवरून येणाऱ्या संक्रमितांची संख्याही फार कमी झालेली नाही. कुंकळ्ये - म्हार्दोळ भागात आढळलेला संशयित हा नव्या चिंतेची बाब ठरला आहे. 

ग्रामीण भागातही शिरकावमहामारीपासून रक्षणासाठी खेडेगावे ही सुरक्षित आहेत अशी एक धारणा होती. आता खेडी ही सुरक्षित राहिली नसल्याचे संकेत मिळत आहेत. सांगे सारख्या भागात आणि म्हार्दोळ कुंकळ्ये सारख्या भागात संसर्गित आढळणे धक्कादायक आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या