शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : सर्व गोमंतकीयांच्या कोरोना चाचणीची गरज नाही : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 19:48 IST

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली व सर्वेक्षण हे कोरोनाविषयी लोकांत मोठी जागृती घडवून आणील व लोक जास्त काळजी घेऊ लागतील असा विश्वास व्यक्त केला.

पणजी : गोव्यातील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, कारण गोव्यात कोरोनाचा सामाजिक प्रसार झालेला नाही. मात्र पूर्ण गोव्यात सर्वेक्षण केल्यानंतर जे संशयित वाटतील, त्यांच्याच नावांची शिफारस कोरोना चाचणीसाठी केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली व सर्वेक्षण हे कोरोनाविषयी लोकांत मोठी जागृती घडवून आणील व लोक जास्त काळजी घेऊ लागतील असा विश्वास व्यक्त केला.कोरोनाचा प्रसार कसा होतो व त्याविरुद्ध आयुर्वेदानुसार व अन्य पद्धतीने कशी काळजी घ्यावी याविषयी जागृती करणारी पत्रके घरोघर वाटली जातील. सर्व्हे करणा-या कर्मचा-यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाईल. जो कर्मचारी ज्या गावात राहतो, त्याच गावात तो सर्वेक्षण करील. त्याला वाहतूक व जेवण सरकार पुरविल. ज्यांना डायबेटीस किंवा रक्तदाबाची समस्या आहे, त्यांना आम्ही सर्वेक्षणाचे काम दिलेले नाही. राजस्थानच्या बिलवारा जिल्ह्यात जसे दहा लाख लोकांचे सर्वेक्षण केले गेले, तसेच गोव्यात केले जाईल. गोव्यात त्यामुळे करोनाचा सामाजिक प्रसार होऊ शकणार नाही. लोकानी सर्वेक्षणावेळी खरीखुरी माहिती द्यावी. घरात कुणाला डायबेटीस असल्यास थंडी ताप झाल्यास कुणी अलिकडे विदेशात प्रवास केला असल्यास सांगाव. शेजा-यांबाबतही जर कुणाला काही माहिती असेल तर ती माहिती देखील देता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.सर्वेक्षणाचा निर्णय हा आरोग्य खात्यातील तज्ज्ञ अधिकारी तसेच आरोग्य सचिवांनी अभ्यासाअंती घेतला. तो राजकीय निर्णय नाही. सर्वेक्षण गोव्याला खूप उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.राज्यात आता मोठय़ा प्रमाणात मास्क उपलब्ध आहेत. सत्तर हजार लिटर सॅनिटायजरचीही निमिर्ती काही कंपन्यांनी केली व त्यापैकी वीस हजार लिटर त्यांनी सरकारी यंत्रणांना मोफत दिले आहेअसे मुख्यमंत्र्यंनी सांगितले.शिक्षकांकडून दिवसाचा पगारराज्यातील प्राथमिक शिक्षकांची संघटना आपल्याला भेटली. शिक्षकांनी एका दिवसाचा पगार कोविद मदत निधीसाठी दिला आहेअसे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्यातील 164 पंचायतींनी मान्सूनपूर्व कामे सुरू केली. पालिकांनीही अशी कामे सुरू करावीत असे मुख्यमंत्री म्हणाले.सरकारी खर्च कमी करणारदरम्यान, पुढील वर्षभर सरकारी खर्च विविध पद्धतीने कमी केला जाईल. तो कसा कमी करावा हे ठरवण्यासाठी तिघा आयएएस अधिका-यांची समिती नेमली गेली आहे. गोव्याची अर्थव्यवस्था नव्याने सुरू व्हायला हवी म्हणूनही एक अभ्यास गट शुक्रवारपर्यंत स्थापन केला जाईल. त्यावर काही तज्ज्ञ असतील. लोकांनीही विविध व्यवसाय-धंद्यांना पुन्हा कशी चालना द्यावी याविषयी मेलद्वारे किंवा वॉट्स अ‍ॅपद्वारे सूचना कराव्यात असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या