शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ४७३ गोमंतकीय बांधवांना घेऊन मुरगाव बंदरात पोचले ‘नॉर्वेजियन एस्केप’ जहाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 20:35 IST

सकाळी ८ वाजता मुरगाव बंदराच्या क्रुज धक्यावर ‘नॉर्वेजियन एस्केप’ नावाचे विदेशी जहाज दाखल झाले आहे. या जहाजात २५०० हून अधिक खलाशी बांधव असल्याची माहीती जेरॉम यांनी देऊन यापैंकी ४७३ गोमंतकीय असल्याचे त्यांनी सांगितले.

वास्को - सोमवारी (दि.२९) सकाळी ‘नॉर्वेजियन एस्केप’ हे विदेशी जहाज २५०० हून अधिक जहाजावर खलाशी म्हणून काम करणा-या बांधवांना घेऊन एमपीटी च्या क्रुज धक्यावर दाखल झाले. यापैंकी ४७३ खलाशी म्हणून काम करणारे बांधव गोमंतकीय असून, त्यांना येथे सोडण्यात आल्यानंतर सदर जहाज इतर बांधवांना सोडण्यासाठी दुस-या बंदरावर जाण्याकरिता निघणार आहे. या ४७३ गोमंतकीय बांधवांचे कोरोनाबाबत चाचणी करण्यासाठी नमूने घेण्याच्या कामाला सोमवारी सुरवात झाली असून चाचणींचा अहवाल येईपर्यंत त्यांना याच जहाजावर ठेवणार असल्याची माहीती एमपीटी चे वरिष्ठ वाहतूक उपव्यवस्थापक जेरॉम क्लेमेंत यांनी दिली.११ दिवसापूर्वी मुरगाव बंदरात ‘सेलेब्रेटी इंन्फनेटी’ नावाचे विदेशी जहाज १४५० गोमंतकीय खलाशी बांधवांना घेऊन दाखल झाले होते. त्या जहाजावरील सर्व गोमंतकीयांचे कोरोनाबाबत अहवाल ‘नेगेटीव्ह’ आल्यानंतर ‘एसओपी’ नियमाचे पालन करून नंतर त्यांना जहाजावरून घरी पाठवण्यात आले होते. सोमवारी (दि.२९) सकाळी ८ वाजता मुरगाव बंदराच्या क्रुज धक्यावर ‘नॉर्वेजियन एस्केप’ नावाचे विदेशी जहाज दाखल झाले आहे. या जहाजात २५०० हून अधिक खलाशी बांधव असल्याची माहीती जेरॉम यांनी देऊन यापैंकी ४७३ गोमंतकीय असल्याचे त्यांनी सांगितले. गोमंतकीय बांधवांना गोव्यात सोडण्यासाठी हे जहात मुरगाव बंदरात आले असून, यानंतर महाराष्ट्र व इतर भागातील खलाशी बांधवांना सोडण्याकरिता सदर जहाज मुंबई बंदरावर जाण्यासाठी निघणार असून त्यानंतर सदर जहाज फिलीपींन्स राष्ट्रात जाणार असल्याची माहीती जेरॉम यांनी दिली. या जहाजातून आलेल्या ४७३ गोमंतकीयांचे कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यासाठी अहवाल घेण्याचे काम सुरू केल्यानंतर संध्याकाळी ५ पर्यंत सुमारे ३०० जणांचे नमूने घेण्यात आले होते. सोमवारी रात्री पर्यंत सर्व ४७३ बांधवांचे कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यासाठी नमूने घेण्याचे काम पूर्ण होणार असा विश्वास जेरॉम यांनी पुढे व्यक्त केला.कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्याकरिता नमूने घेण्याचे काम करण्यासाठी आरोग्य खात्याने मुरगाव बंदरात सोमवारी २० डॉक्टर, आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांचे पथक नियुक्त केल्याची माहीती जेरॉम यांनी दिली. चाचणीसाठी नमूने घेतल्यानंतर या जहाजातून आलेल्या ४७३ गोमंतकीय बांधवांचे मंगळवारपर्यंत अहवाल येणार असल्याची अपेक्षा जेरॉम क्लेमेंन्त यांनी व्यक्त केली. अहवाल ‘नेगेटीव्ह’ आल्यानंतर ‘एसओपी’ नियमाचे पालन करून या बांधवांना त्यांच्या घरी कोरंन्टाईनसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहीती जेरॉम क्लेमेंन्त यांनी पुढे दिली. जो पर्यंत सदर गोमंतकीय खलाशी बांधवांचा कोरोना विषाणूबाबत अहवाल येत नाही तो पर्यंत ते याच जहाजावर राहणार अशी माहीती जेरॉम यांनी दिली. सदर जहाज ग्रीस, इजिप्तमार्गे होत गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झाले असल्याचे जेरॉम यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा