शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 19:17 IST

श्रीपाद नाईक यांनी दीड महिन्यापूर्वीही कोविड चाचणी करून पाहिली होती. त्यांच्या अन्य कुटुबीयांनीही कोविड चाचणी करून घेतली होती. पण...

ठळक मुद्देगोव्यात कोविड रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी 480 नवे कोविडग्रस्त आढळले.

पणजी : उत्तर गोव्याचे लोकसभा खासदार व केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांची कोविड चाचणी बुधवारी पॉझिटिव्ह आली आहे. नाईक यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. नाईक सायंकाळी दिल्लीला जाणार होते, पण कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी दिल्ली दौरा रद्द करून घरीच आयसोलेशनमध्ये राहिले आहेत.

श्रीपाद नाईक यांनी दीड महिन्यापूर्वीही कोविड चाचणी करून पाहिली होती. त्यांच्या अन्य कुटुबीयांनीही कोविड चाचणी करून घेतली होती. पण त्यावेळी त्यांच्या घरातील कुणीच कोविड पॉझिटिव्ह आढळले नव्हते. श्रीपाद नाईक यांच्या मूळगावी व एकूणच मडकई मतदारसंघातील काही भागात कोविडचे रुग्ण यापूर्वी आढळले आहेत. आता चक्क श्रीपाद नाईक यांनाच कोविडची लागण झाल्याने नाईक यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींना थोड्या गोंधळल्या आहेत. त्या व्यक्तींनीही स्वत:ची कोविड चाचणी करून घेणो सुरू केले आहे.

दरम्यान, आपली कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली पण आपल्याला कोणतीही लक्षणे नाहीत. आपण ठीक आहे. आपण घरीच  आयसोलेशनमध्ये आहे, गेले काही दिवस आपल्या संपर्कात ज्या व्यक्ती आल्या त्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी व आवश्यक ती खबरदारीही घ्यावी, असे आवाहन स्वत: श्रीपाद नाईक यांनी केले आहे. नाईक यांनी सायंकाळी तसे ट्विट केले.

गोव्यात कोविड रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी 480 नवे कोविडग्रस्त आढळले. यामुळे सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 3194 झाली आहे. तिघा कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला आहे व यामुळे कोविडमुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 89 इतकी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा