शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

CoronaVirus News in Goa : गोव्यात लग्न समारंभ बंद, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 14:26 IST

CoronaVirus News in Goa : लॉकडाऊनमुळे सुरूवातीच्या काळात बंद असलेली सिव्हिल रजिस्ट्रार कार्यालये आता सुरु झाली आहेत. दिवसाकाठी १५ ते १६ विवाहांची नोंदणी केली जात आहे. मालम

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे सुरूवातीच्या काळात बंद असलेली सिव्हिल रजिस्ट्रार कार्यालये आता सुरु झाली आहेत. दिवसाकाठी १५ ते १६ विवाहांची नोंदणी केली जात आहे.

पणजी : गोव्यात लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष विवाह समारंभ शक्य नसले तरी सिव्हिल रजिस्ट्रार कार्यालयांमध्ये दिवसाकाठी सरासरी १५ ते १६ विवाहांची नोंदणी रोज केली जात आहे. राज्यात पोर्तुगीज सिव्हिल कोडनुसार विवाहाआधी नोंदणी बंधनकारक आहे. सिव्हिल रजिस्ट्रारकडे दोन खेपा माराव्या लागतात. लॉकडाऊनच्या काळात सध्या विवाह समारंभ बंद आहेत. हॉलमधील बुकिंगही रद्द झालेली आहेत. तसेच केटरर्सचा व्यवसायही थंडावला आहे. तरी देखिल नोंदणी विवाह होत आहेत. 

लॉकडाऊनमुळे सुरूवातीच्या काळात बंद असलेली सिव्हिल रजिस्ट्रार कार्यालये आता सुरु झाली आहेत. दिवसाकाठी १५ ते १६ विवाहांची नोंदणी केली जात आहे. मालमत्ताविषयक नोंदणी, विक्री खत नोंदणी तसेच विवाह नोंदणीच्या कामांनी गती घेतली आहे. मंगळवारी दिवसभरात ५६ मालमत्ताविषयक नोंदणी आणि १५ विवाह नोंदणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विवाह नोंदणीच्यावेळी साक्षीदार म्हणून सहीसाठी आवश्यक वधू-वरांच्या उभय बाजूकडील एक-दोन मोजक्याच व्यक्ती याव्यात. कार्यालयात तसेच आवारातह सोशल डिस्टंसिंग पाळले जावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार गोव्यात वर्षाकाठी सरासरी ११ हजार विवाह होतात व त्याची नोंदणी सरकार दरबारी केली जाते. पोर्तुगीज समान नागरी कायद्यानुसार जन्म, मृत्यूबरोबरच प्रत्येक विवाहाची नोंदणी सरकार दरबारी बंधनकारक आहे. अशा नोंदणीसाठी वधू किंवा वर यापैकी एकजण गोव्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे आणि किमान सहा महिने गोव्यात वास्तव्य असणे बंधनकारक आहे.

गोव्याचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक सेलेब्रिटीही गोव्यातच कायदेशीर विवाह नोंदणीला पसंती देतात. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त व अभिनेत्री मान्यता यांचा गोव्यातील विवाह एकेकाळी बराच गाजला होता. काही विदेशी नागरिकही गोव्यातच विवाहाला पसंती देतात. विवाह समारंभ सध्या लॉकडाऊनमुळे बंद असल्याने केटररर्स तसेच अन्य व्यावसायिकही डबघाईला आले आहेत. 

मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन : राज्य निबंधक सिव्हिल रजिस्ट्रार खात्याचे राज्य निबंधक तथा नोटरी सेवाप्रमुख ब्रिजेश मणेरकर म्हणाले की, ‘विवाहाची पहिली नोंदणी आणि दुसरी नोंदणी करावी लागते. या सह्या झाल्यानंतर कायदेशीर विवाह झाल्याचे मानले जाते. रोज सरासरी १५ ते १६ विवाहांची नोंदणी होते. याशिवाय जमीन व्यवहारांची विक्री खते, तारण व्यवहार, भाडेकरार आदी मिळून सरासरी ५0 दस्तऐवजांचे रजिस्ट्रेशन होते. बाराही तालुक्यांमध्ये सिव्हिल रजिस्ट्रार कार्यालये आहेत. सर्व कार्यालयांमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे सोशल डिस्टंसिंग व इतर नियम पाळले जात आहेत. 

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या