शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

CoronaVirus News in Goa : सासष्टीत 8 गावांमध्ये कोरोनाचा फैलाव, नागरिकांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 20:37 IST

CoronaVirus News in Goa: मडगाव, कुडतरी, आंबेली या तीन गावासह राय, लोटली, नावेली, नुवे व केळशी या  भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

ठळक मुद्देमंगळवारी कुडतरी येथे तीन नवीन रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 28 वर तर लोटली येथे 2 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 6 झाली आहे.

मडगाव:  सासष्टीत कोरोना फैलाव फक्त मडगाव, कुडतरी आणि आंबेली या गावापुरताच राहिलेला नसून एकूण 8 गावात पसरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . मंगळवारी कुडतरी येथे तीन नवीन रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 28 वर तर लोटली येथे 2 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 6 झाली आहे. या पार्श्वभूमीवर या तालुक्यातील कोविड निगा केंद्रात वाढ करण्यात आली आहे.

मडगाव, कुडतरी, आंबेली या तीन गावासह राय, लोटली, नावेली, नुवे व केळशी या  भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कुडतरी येथील रुग्णाची संख्या सर्वात जास्त म्हणजे 25 आहे. मडगावात 16, आंबेलीत 15, राय येथे 7, लोटली येथे 4 केळशी येथे 2 तर नावेली आणि नुवे येथे प्रत्येकी एक रुग्ण सोमवार पर्यंत आढळले होते.

या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढण्याची संख्या लक्षात ठेवून कालकोंडा येथील दैवज्ञ भवन कोविड निगा केंद्र म्हणून जाहीर केले असून या केंद्रात 150 ते 200 खाटांची सोय करण्यात येणार असून या केंद्रात लक्षणे दिसून न येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. मडगाव रेसिडेन्सीही कोविड निगा केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले असून जर वैद्यकीय सेवा देणारे पॉझिटिव्ह आढळले तर त्यांच्यावर या केंद्रात उपचार करण्यात येणार आहेत. या शिवाय नावेली स्टेडियम, फातोरडा इनडोअर स्टेडियम आणि कोलवा रेसिडेन्सी अशी तीन केंद्रे यापूर्वीच निगा केंद्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

वेळली मतदारसंघातील आंबेली या गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने या मतदारसंघातील 5 पंचयती स्वतःहून पुढे आल्या असून त्यांनी या रुग्णांना ठेवण्यासाठी स्वतःहून कोविड निगा केंद्रासाठी जागा सुचविल्या आहेत. आंबेली भागांसाठी पंचायत घर तसेच एसपी हॉल,  असोळणा येथे रेजिना हॉल, तर वेळलीसाठी रिव्हर साल, सी गर्ल, मे फेअर या तीन हॉटेल्ससह टल्याकट्टा स्टेडियम आणि बाराडी सामाजगृह अशा जागा सरकारला सुचविण्यात येणार असल्याची माहिती वेळलीचे सरपंच सावियो डिसिल्वा यांनी दिली.

व्यावसायिक प्रकल्पात क्वारंटाईन केंद्रमडगावच्या मध्यभागी असलेल्या रिलायन्स ट्रेड सेन्टर या गजबजलेल्या व्यावसायिक प्रकल्पात असलेले तनिष हॉटेल क्वारंटाईन केंद्र केले आहे. त्यामुळे या प्रकल्पातील इतर आस्थापणांनी भीती व्यक्त केली आहे. याच प्रकल्पात एलआयसीचे कार्यालय असून त्यात दर दिवशी शेकडो लोक येत असतात. या हॉटेलमध्ये निगराणीखाली ठेवलेले काहीजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना कोविड निगा केंद्रात हलविण्यात आले. या प्रकल्पात एकच लिफ्ट असून ती लोक वापरतात त्याच लिफ्टचा वापर रुग्णाणाही नेण्यासाठी केला जात असल्याने इतरांनी भीती व्यक्त केली आहे. अशाने इतराना कोरोना होऊ शकतो असा दावा केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केल्यास आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी बातम्या...

वाहतूक कोंडीमुळे ‘वर्क फ्रॉम कार’, प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका

दुबईत भारतीय जोडप्याची हत्या, पाकिस्तानच्या नागरिकाला अटक

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'

"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा