शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोविड इस्पितळात पहिल्या बाळाचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 03:17 IST

गोव्यातील कुटुंबाला दिलासा; गोमेकॉ डॉक्टरांकडून यशस्वी शक्रिया

पणजी : कोविड संसर्गित व्यक्तीवर उपचार करणे, हे उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठीही जोखमीचे असते, अशा परिस्थितीतही एका संसर्गित गर्भवती महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचे काम मडगाव येथील कोविड इस्पितळात करण्यात आले. कोविड इस्पितळात पहिले बाळ जन्माला आले.मांगोरहिल येथील ३३ वर्षांची महिला ही कोविड संसर्गित आढळली होती. तिला कोणतीही लक्षणे नसल्यामुळे तिला कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले नव्हते. परंतु ती गर्भवती होती आणि शुक्रवारी संध्याकाळी तिला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले. लवकरच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर अंकिता सिनाई बोरकर व त्यांच्या पथकाने तिच्यावर यशस्वीरीत्या प्रसूती शस्त्रक्रिया केली.ही गर्भवती महिला कोविड संसर्गित आढळल्यामुळे त्या महिलेवर आणि तिच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. कारण आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गर्भवती महिलांना कोविडचा संसर्ग हा चिंताजनक ठरू शकतो. परंतु प्रसूतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे तिला व तिच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. महिला व तिच्या बाळाची (मुलगी) प्रकृती स्थिर असल्याची माहिती इस्पितळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. बाळाची प्रकृती ठीक असली तरी त्याचीही कोविड चाचणी केली जाणार असल्याचे इस्पितळातील सूत्रांकडून सांगण्यात आले. बाळ अजून मातेकडे सोपविण्यात आलेले नाही. बाळाला कोविड संसर्ग झालेला नसल्यास तिच्याकडे ठेवले जाणार नाही. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी डॉ. अंकिता आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. गोव्यातील ही अशा प्रकारची पहिली घटना असून, महाराष्ट्रात अशा गर्भवती महिलेवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.मॉक ड्रिल : महामारीच्या या काळात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी वैद्यकीय पथकाने ठेवलेली असते. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून तसा सरावही होतो. त्याला ‘मॉक ड्रिल’ असे म्हणतात. संसर्गित गर्भवती महिलेवर प्रसूती शस्त्रक्रिया करावी लागल्यास ती कशी करावी याचे मॉक ड्रिलही करण्यात आले होते, असे आरोग्य खात्याच्या उपसंचालक डॉ. आयरा आल्मेदा यांनी याविषयी माध्यमांना सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या