शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

CoronaVirus News: 4000 पेक्षा अधिक खलाशी गोव्याच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 19:09 IST

एकूण 6 जहाजे भारताच्या दिशेने: आतापर्यंत 2564 जण गोव्यात

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: जगभरात अडकलेले 4000 पेक्षा अधिक खलाशी चालू पंधरवड्यात गोव्यात  येणार असून या खलाशाना घेऊन 6 जहाजे भारताकडे रवाना झाली आहेत.

गोवा खलाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, काही जहाजे येत्या एक दोन दिवसात पोहोचणार आहेत तर काही जहाजे काहीशा विलंबाने  गोव्यात पोहोचतील.

सध्या गोव्यात येणाऱ्या खलाशाना आणि विदेशस्थ गोवेकरांना गोव्यात येण्याच्या अटी शिथिल करण्यात आल्या असून विदेशातून गोव्यात येणाऱ्याठी कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली असून जोपर्यंत चाचणीचा निकाल येत नाही तो पर्यंत त्यांना सशुल्क क्वारंटाईन करून गरजेचे असून त्यात जर निगेटिव्ह आढळल्यास त्यांना 14 दिवस घरात विलग अवस्थेत राहता येणार आहे.

गोव्याचे एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण 2304 खलाशी आणि वेगवेगळ्या 31 देशात अडकलेले 260 गोमंतकीय गोव्यात पोहोचले आहेत. वंदे भारत योजनेखाली दुबईहुन एक विमान गोव्यात आले. त्याशिवाय 11 चार्टर विमानातून खलाशी गोव्यात आले आहेत.

डिक्सन वाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार आता आणखी काही चार्टर विमाने खलाशाना घेऊन गोव्यात येणार आहेत. सध्या या खलाशाना विलग करून ठेवण्यासाठी 31 हॉटेल्स बुक करण्यात आली असून 1819 खोल्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

भविष्यात गरज पडण्याची शक्यता असल्याने पांझरखणी कुंकळी येथील नूसी इस्पितळ सज्ज करून ठेवण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.

हुश्श! क्वारंटाईन पर्यटन संपले एकदाचेगोवा सरकारने विदेशातून येणाऱ्या भारतीयांसाठी  नवीन एसओपी लागू केला असून जर कुणी निगेटिव्ह सापडल्यास त्याला 14 दिवस घरात विलग राहण्याची मोकळीक देण्यात आली आहे त्यावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना हुश्श क्वारंटाईन पर्यटन संपले एकदाचे असे म्हटले. ते म्हणाले, या सरकारच्या निर्णयाला मागचे अडीच महिने गोव्यातून आणि गोव्याबाहेरून जे विरोध करत होते त्या गोयकारवादी शक्तीचा हा विजय असे ते म्हणाले.