शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गोव्यात पर्यटन सुरू करण्यासाठी आग्रह, दोनशे हॉटेलांकडून अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:08 IST

कोविडमुळे सगळे बार, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स गेल्या मार्चपासून बंद आहेत. देशाच्या जीडीपीच्या दहा टक्के परिणाम पर्यटन धंदा बंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

पणजी : राज्याचे पर्यटन टप्प्याटप्प्याने सुरू केले जावे अशी मागणी गोवा टूर अॅण्ट ट्रॅव्हल असोसिएशनने शनिवारी सरकारकडे केली आहे. राज्यातील दोनशे हॉटेलांनी हॉटेल्स सुरू करण्यासाठी पर्यटन खात्याकडे अर्ज केले पण सरकारने अजून मान्यता दिलेली नाही व हॉटेल्सही सुरू झालेली नाहीत असे संघटनेचे अध्यक्ष निलेश शाह यांनी नमूद केले आहे.

कोविडमुळे सगळे बार, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स गेल्या मार्चपासून बंद आहेत. देशाच्या जीडीपीच्या दहा टक्के परिणाम पर्यटन धंदा बंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे. गोव्यात हा परिणाम 40 टक्के आहे. त्या शिवाय अन्य अनेक परिणाम झाले आहेत, असे शाह यांनी म्हटले आहे. आणखी जास्त काळ हॉटेल्स किंवा पर्यटन बंद राहू शकत नाही. यामुळे बेरोजगारीत भर पडेल व महसुलाचीही हानी होईल. देशाच्या विविध भागांमध्ये पर्यटन व्यवसाय खुला होत आहे. गोव्यातही त्याच पद्धतीने मार्गदर्शक तत्त्वे व प्रक्रिया आणून हॉटेल्, बार व रेस्टॉरंट्स सुरू करायला हवीत अशी मागणी संघटनेने केली आहे. बार व रेस्टॉरंट्स सुरू करायला सरकारकडून परवानगी मिळाल्याशिवाय हॉटेल्सही खुली करता येत नाहीत. हॉटेल सुरू करताना बार व रेस्टॉरंट्सही खुली करण्यासाठी मान्यता मिळायला हवी, असे शाह यांनी म्हटले आहे.  राज्यात हजारो हॉटेल्स आहेत, ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे पण सद्या दोनशेजणांनीच अर्ज केले आहेत. गेल्या 8 जून रोजी सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंट्स खुली व्हावीत असे अपेक्षित होते. मात्र अर्ज सरकारने मागून घेतल्यानंतर त्या अर्जाना अजुनही मान्यता दिली गेलेली नाही यावर संघटनेने बोट ठेवले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtourismपर्यटन