शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गोव्यात क्वारंटाइन केंद्रांना गावागावात वाढता विरोध; ग्रामस्थ करु लागले मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 14:32 IST

परराज्यांमधून तसेच विदेशातून गोव्यात येणाºया प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या रेसिडेन्सी तसेच काही खाजगी हॉटेल्स व अन्य आस्थापने सरकारने घेतलेली आहेत

पणजी : आपल्या गावात क्वारंटाइन केंद्रे नकोच असा आक्रमक पवित्रा घेत गोव्यात ठिकठिकाणी ग्रामस्थ उठाव करु लागले आहेत. गेल्या आठवड्यात कांदोळी येथे मध्यरात्रीच्या सुमारास लोक जमले आणि गावात क्वारंटाईन करण्यास विरोध केला त्यानंतर शनिवारी दक्षिण गोव्यात बेतालभाटीतही असाच प्रकार घडला. सोमवारपासून राज्यात प्रवाशांची संख्या वाढणार आहे या गर्दीमुळे गावागावांमधील हॉटेलांमध्ये क्वारंटाइन करावे लागेल त्यामुळे पुढील काही दिवसात या विरोधाची तीव्रता आणखी वाढणार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरही पेच निर्माण झालेला आहे. 

परराज्यांमधून तसेच विदेशातून गोव्यात येणाºया प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या रेसिडेन्सी तसेच काही खाजगी हॉटेल्स व अन्य आस्थापने सरकारने घेतलेली आहेत. मात्र प्रवाशांना तेथे पाठवल्यानंतर स्थानिक लोक विरोध करतात. शनिवारी बेतालभाटी येथे एका हॉटेलमध्ये क्वारंटाइनसाठी नेलेल्या आठजणांना स्थानिकांनी अडवून मज्जाव केला. माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको, बेतालभाटीचे सरपंच कोंसेसांव मिरांडा हे विरोधकांचे नेतृत्त्व करीत होते. शेवटी या आठ प्रवाशांना क्वारंटाइनसाठी कोलवा येथील हॉटेलमध्ये हलवावे लागले. 

पर्यटन सचिवांनी अलीकडेच राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत १७00 नव्या खोल्या सरकारने प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी सज्ज ठेवल्या असल्याची माहिती दिली. या खोल्या खास करुन किनारपट्टीत असलेल्या हॉटेलांमधील आहेत. 

गोवेकर खलाशांनी जावे कुठे?  - आग्नेल फर्नांडिस

काँग्रेसचे प्रवक्ते तथा कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी विरोधकांनी गोमंतकीय खलाशांनी जावे कुठे? असा सवाल केला आहे. ते म्हणाले की, ‘कांदोळीतील वाडी येथील ज्या हॉटेलात गोमंतकीय खलाशांना क्वारंटाइनसाठी मज्जाव करण्यात आला त्या विस्परिंग पाल्म हॉटेलपासून जवळ असलेल्या दुसºया एका हॉटेलात काही दिवसांपूर्वी परराज्यातील प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांना कोणीच विरोध केला नाही. खलाशी मुंबईहून ‘कोरोना निगेटिव्ह’ असल्याचे दाखले घेऊन आले होते त्यामुळे त्यांना विरोध करण्याची गरज नव्हती. 

अभिनेत्री पूजा बेदीला सवलत का?

आम आदमी पक्षाचे निमंत्रक एल्विस गोम्स म्हणाले की, ‘ग्रामस्थांची ही भूमिका चुकीची आहे. परंतु लोकांनाही दोष देऊन चालणार नाही कारण सरकारने पुरेशी जागृती केलेली नाही. एडस्पेक्षाही हे भयंकर दुखणे बनलेले आहे. केवळ निगराणीखाली ठेवण्यासाठी म्हणून प्रवाशांना क्वारंटाइन केले जाते, ते पॉझिटिव्ह रुग्ण असतात असे नव्हे. उद्या इस्पितळांच्या परिसरात राहणारे लोकही विरोध करतील. याला काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे सरकारने गावागावात तज्ञ डा्रॅक्टरना पाठवून आधी लोकांमध्ये जागृती करायला हवी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या