शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : गोव्यात आता कडक उपाययोजना होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 20:18 IST

Coronavirus :कर्नाटक व महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांनाही सीमेवर रोखण्याची उपाययोजना केली जाण्याची दाट शक्यता आहे.

पणजी : गोव्यात कोरोनाचा एकही रुग्ण अजून सापडलेला नाही, ही चांगली गोष्ट आहे. विदेशी पर्यटकांची दाबोळी विमानतळावर तपासणी केली जातेच. मात्र यापुढे देशी पर्यटकांचीही तपासणी करावी लागेल. तसेच कर्नाटक व महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांनाही सीमेवर रोखण्याची उपाययोजना केली जाण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी त्याविषयीचे संकेत दिले. एकदा जिल्हा पंचायत निवडणूक आटोपली की मग कडक उपाययोजना सुरू होईल, असे ते म्हणाले.

मध्य पूर्व राष्ट्रांमधून गोव्यात अनेक पर्यटक येतात. शिवाय, तिथे जे गोमंतकीय काम करत होते, त्या गोमंतकीयांनीही गोवा गाठण्यास आरंभ केला आहे. या सर्वाची दाबोळी विमानतळावर आता तपासणी केली जातेच पण देशी पर्यटकांचीही यापुढील काळात तपासणी केली जाईल. काही पर्यटक मुंबईत जहाजाने येतात व मग मुंबईहून ते देशी विमानाने गोव्यात येतात. यापुढे सर्वच देशी पर्यटकांचीही तपासणी करावी लागेल. त्यासाठी ज्यादा थर्मल स्कॅनर्स आम्ही घेत आहोत. प्रत्यक्ष खरेदीचे काम जिल्हाधिकारी करतील, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

गोव्यात कडक उपाययोजनाआम्ही प्रत्येक पब, स्पा वगैरे बंद केले आहेत. कॅसिनोही बंद केले. याचे कारण जनतेच्या हिताची सरकारला काळजी आहे. कडक उपाययोजना करावीच लागते. आठवडय़ाचे बाजारही बंद केले. यापुढील पाऊलेही भविष्यात उचलावी लागतील. कारण गोव्यात कोरोनाचा रुग्ण सापडला तर समस्या निर्माण होईल. हॉटेलमधील विवाह सोहळेही बंद करण्याचे आदेश आम्ही दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कफ्यरूचे आवाहन केले आहे. जनता कफ्यू हाच उपाय आहे, असे मंत्री राणे म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या