शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गोव्यात अजूनही पाच हजार विदेशी नागरिक; एकही जागा हॉटस्पॉट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 16:29 IST

पर्यटन हंगामावेळी गोव्याच्या पर्यटनाचा लाभ घेण्यासाठी हे विदेशी नागरिक आले होते. तथापि, कोरोनामुळे लॉक डाऊन झाल्याने ते इथेच अडकून पडले.अनेक रशियन्सही गोव्यात आहेत.

पणजी : गोव्यात अजूनही साडेचार ते पाच हजार विदेशी नागरिक आहेत. गोव्याहून 23 खास विमानांद्वारे 4 हजार 239 विदेशी पर्यटक त्यांच्या मायदेशी परतले तरी, अजून पाच हजार विदेशी गोव्यात आहेत, अशी माहिती विदेशातील दूतावासांनी गोवा सरकारच्या यंत्रणोला दिली आहे. मुख्य सचिव परिमल रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची शुक्रवारी बैठक झाली. त्यावेळी ही माहिती समोर आली. पर्यटन हंगामावेळी गोव्याच्या पर्यटनाचा लाभ घेण्यासाठी हे विदेशी नागरिक आले होते. तथापि, कोरोनामुळे लॉक डाऊन झाल्याने ते इथेच अडकून पडले.अनेक रशियन्सही गोव्यात आहेत.गोव्यात कोरोनाविषयक स्थिती कशी आहे, मदत कार्य कसे सुरू आहे, लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी सुरू आहे व येत्या 20 नंतर कोणत्या सेवा किंवा व्यवसाय गोव्यात सुरू करता येतील याविषयीही बैठकीत चर्चा झाली. गोव्यात कोरोनाचा सामाजिक प्रसार झालेला नाही. आतापर्यंत जे सात रुग्ण आढळले, त्यापैकी सहाजण विदेशातूनच आले होते. सातपैकी सहा रुग्ण उपचारानंतर बरे झाले. आता फक्त एकच कोरोना पॉझिटिव्ह कोविद इस्पितळात उपचार घेत आहे.केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रलयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गोव्यात कोविदचा एकही हॉटस्पॉट नाही. दोन्ही जिल्हे नॉन हॉटस्पॉट गटात येतात. त्यामुळेच केंद्रीय गृह मंत्रलयाच्या यादीनुसार गोव्यात येत्या दि. 20 नंतर अतिरिक्त व्यवसायिक उपक्रम सुरू करता येतात असे आरोग्य सचिवांनी बैठकीत सांगितले. गोव्यासाठी एक हजार थर्मल गन्सची खरेदी केली जाणार आहे. राज्याच्या सीमांवर यापुढे जलदगतीने कोविद चाचणी  करण्याचे काम केले जाणार आहे. तीन दिवसांत घरोघर सर्वेक्षण ज्या कर्मचा-यांनी पूर्ण केले त्यांची बैठकीत प्रशंसा करण्यात आली. अबकारी आयुक्तांच्या मते गोव्यात मद्यनिर्मिती उद्योगांनी एकूण 1 लाख 58 हजार लिटर सॅनिटायझरची निर्मिती केली. त्यापैकी 33 हजार 500 लिटर सॅनिटायझर गोवा सरकारला व संरक्षण दलाला पुरविण्यात आले.

टॅग्स :goaगोवा