शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : गोवा सरकार पुढील 15 दिवसांसाठी जाहीर करणार रोडमॅप, काही उपक्रम सुरू करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 20:28 IST

कोणते व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करायचे व कोणते नाही ते रोडमॅपनुसार ठरेल.

ठळक मुद्देगोवा सरकार पुढील पंधरा दिवसांसाठी स्वत:चा रोडमॅप गोव्यासाठी जाहीर करणार सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्याची वाहतूक करण्यासाठी 206 बसगाडय़ांची व्यवस्था लोकांनी मात्र सरकारी कार्यालयांमध्ये सध्या कामे घेऊन येऊ नये

पणजी -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण उद्या सकाळी पार पडल्यानंतर गोवा सरकार पुढील पंधरा दिवसांसाठी स्वत:चा रोडमॅप गोव्यासाठी जाहीर करणार आहे. काही उपक्रम सुरू केले जातील. कोणते व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करायचे व कोणते नाही ते त्या रोडमॅपनुसार ठरेल. सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्याची वाहतूक करण्यासाठी 206 बसगाडय़ांची व्यवस्था सरकारने केली आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. सरकारी कार्यालये सुरू झाली आहेत. बुधवारपासून जी कामे मूलभूत व महत्त्वाची आहेत, ती सुरू केली जातील. लोकांनी मात्र सरकारी कार्यालयांमध्ये सध्या कामे घेऊन येऊ नयेत. खाते प्रमुखांनी कार्यालयांची रचना करताना सोशल डिस्टनसींगला प्राधान्य द्यावे.कोणत्या कर्मचाऱ्याला कधी कामासाठी बोलवावेते खाते प्रमुख ठरवतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्यापासून ख-या अर्थाने सर्व कार्यालयांमध्ये मूलभूत कामे सुरू होतील. ज्या खात्यांना सध्या काम नाही, त्या खात्यांमध्ये कर्मचारी येण्याची गरज नाही. कला व संस्कृती खात्यामध्ये कर्मचा:यांची गरज नाही पण नागरी पुरवठा खात्यामध्ये गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.8641 मजुरांच्या बँक खात्यात पैसे जमा206 कदंब बसगाडय़ांमधून कर्मचारी येतील व जातील. उगाच लोकांनी त्या बसगाडय़ांमधून प्रवास करू नये. पुढील पंधरा दिवस लोकांनी घरातच रहावे. लॉकडाऊन पाळावा. सरकारी इस्पितळांमध्ये ओपीडी सुरू झाल्या पण लोकांनी गर्दी करू नये. मजुर खात्याने 8641 कामगारांच्या बँक खात्यात काल प्रत्यक्ष प्रत्येकी सहा हजार रुपयेजमा केले. आणखी काही कामगारांना प्रत्येकी चार हजार रुपये मजुर कल्याण मंडळाच्यावतीने दिले जातील, असेमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गोव्यात गेल्या दि. 3 एप्रिलनंतर कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही हे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

सर्व सीमांवर कोविद तपासणी शक्यगोव्याच्या सीमा बंद आहेत पण जीवनावश्यक वस्तू घेऊन ज्या मालगाडय़ा येतात त्यांच्या चालकांची सीमेवर तपासणी करण्यासाठी वैद्यकीय सुविधा सुरू करण्याचा विचार आहे. मालगाडीतून येणाऱ्या कुणाचीही तासाभरात सीमेवर कोविद चाचणी होईल. आठ तपास नाक्यांच्या ठिकाणी तशी सोय करण्याचा विचार असल्याचेमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विदेशात बोटींवर जे खलाशी आहेत, त्यांना जर गोव्यात आणले गेले तर आमच्याकडे हॉटेल्सच्या खोल्या असायला हव्यात म्हणून व्यवस्था केली जात आहे. खोल्या ताब्यात घेण्यास मी पर्यटन खात्याला सांगितले आहे. निर्णय काय तो केंद्र सरकार घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत