शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाचा फैलाव वाढल्याने गोव्यात रविवारपासून कर्फ्यू, विवाहासह सर्व सोहळे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 20:22 IST

Coronavirus in Goa: राज्यात कोविड रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने सरकारने शुक्रवारी  राज्यव्यापी कर्फ्यू जाहीर केला. उद्या रविवारपासून पंधरा दिवस हा कर्फ्यू अंमलात असेल.

पणजी : राज्यात कोविड रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने सरकारने शुक्रवारी  राज्यव्यापी कर्फ्यू जाहीर केला. उद्या रविवारपासून पंधरा दिवस हा कर्फ्यू अंमलात असेल. सर्व विवाह सोहळे, मुंज, शादी वगैरे सगळे कार्यक्रम रद्द ठरले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत खुली राहतील.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे पत्रकार परिषद घेतली व कडक कर्फ्यूची घोषणा केली. लोक घरी राहतच नाहीत, अकारण फिरतात. त्यामुळे पोलिसांना लाठीचा देखील वापर करावा लागतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. येत्या रविवारी सकाळपासून दि. २४ मे सकाळी सहा वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असेल. कुणीच घराबाहेर पडू नये. फक्त सरकारी व खासगी इस्पितळ कर्मचाऱ्यांना कामासाठी जावे लागेल. त्यांना कुणी अडथळे आणू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. रेस्टोरंट्स नव्हे तर टेक अवे सुरू राहील. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत पंधराही दिवस खुली असतील. त्यामुळे लोकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये. अन्य जे व्यवहार बंद राहतील त्याविषयीचा आदेश तपशीलाने आज शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी जारी करतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.विवाह सोहळे सुपरस्प्रेडर राज्यात विवाह सोहळे कोविडसाठी सुपरस्प्रेडर ठरले. पन्नास लोकच विवाहात सहभागी व्हा असे सरकारने सांगून देखील लोकांनी गर्दी केली. नवरा किंवा बायकोला कोविड झालेला आहे असे कळून आल्यानंतर देखील लोक लग्नाला गेले व कोविडग्रस्त झाले अशी उदाहरणे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सर्वांनी विवाह, काजरा, मुंजी वगैरे कार्यक्रम रविवारपासून रद्द करावेत. कुणीच कसलाच व्यक्तीगत किंवा कौटुंबिक कार्यक्रम सध्या करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पर्यटकांना नो कोविडची सक्ती  राज्यात जे पर्यटक येतील त्यांनी नो कोविड प्रमाणपत्र घेऊन यावे. जर असे प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी कोविड लसीकरण केले असल्याचा पुरावा सादर करावा असे मुख्यमंत्र्यांनी सूचविले. कर्फ्यूवेळी औषधालये सुरू राहतील. त्यांना वेळेचे बंधन नसेल. कारण नसताना जर कुणी रस्त्यावर फिरताना आढळला तर पोलिस कारवाई करतील. कोविडची चेन ब्रेक करण्यासाठी हा उपाय आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा