शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

coronavirus: कोरोनाने गोव्यात घेतला अठरावा बळी, गेल्या चार दिवसांत आठ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 12:59 IST

गेल्या चार दिवसांपासून रोज कोविडग्रस्तांचे मृत्यू होत आहेत व लोकांमधील भीतीही वाढत चालली आहे.

पणजी - गोव्यात कोविडमुळे मृत्यू होण्याची मालिका सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून रोज कोविडग्रस्तांचे मृत्यू होत आहेत व लोकांमधील भीतीही वाढत चालली आहे. गेल्या चार दिवसांत आठ मृत्यू झाले. चाळीस ते पन्नास या वयोगटातील रुग्ण कोरोनामुळे आतापर्यंत पाचजण गेले आहेत. मंगळवारी मृत झालेला रुग्ण 47 वर्षे वयाचा आहे.सोमवारी एकूण तिघा कोविडग्रस्तांचे मृत्यू झाले होते. मंगळवारी पहाटे पाच वाजता मडगावच्या कोविड रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. ही व्यक्ती चिखली येथील आहे. त्यास गेल्या 29 जून रोजी रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्याची झुंज सुरू होती. त्याला वेन्टीलेटरवर ठेवले गेले होते.कोविड इस्पितळात रात्री उशिरा आणखी एकाचा मृत्यू झाला पण तो रुग्ण शेवटच्या चाचणीवेळी निगेटिव होता व त्यामुळे त्याला कोविडमुळे मृत्यू झाला असे म्हणता येत नाही. कोरोनामुळे मृत्यू होणा-यांमध्ये विविध वयोगटातील पुरुष व महिला आहेत. कोविडमुळे मरण पावलेल्या एकूण अठरापैकी दहा व्यक्ती ह्या साठ वर्षाहून जास्त वयाच्या आहेत. 80 वर्षाहून अधिक वयाचे तिघे कोविड रुग्ण यापूर्वी मरण पावले. 70 ते 80 या वयोगटातील चौघे मरण पावले. 60 ते 70 वर्षे या वयोगटातील तिघांचा कोरोनाने बळी घेतला. पन्नास ते साठ या वयोगटातील दोघांचा कोरोनाने जीव घेतला. चाळीस ते पन्नास या वयोगटातील पाचजणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. चाळीस वर्षाहून कमी म्हणजे 31 वर्षाच्या एका युवकाचा कोरोनामुळे बळी गेला आहे.आतार्पयत 92 हजाराहून जास्त व्यक्तींची कोविड चाचणी गोव्यात केली गेली. सरासरी ०.61 टक्के व्यक्तींचे बळी गेले. याचाच अर्थ बहुतांश कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. एकूण सरासरी 59.6 टक्के कोविडग्रस्त कोविडमुक्त झाले व घरी गेले. ज्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती किंवा ज्यांना उच्च रक्तदाब, कॅन्सर किंवा मूत्रपिंडाचा विकार होता किंवा ज्यांना पक्षाघाताचा झटका आला होता व कोविडही झाला होता, अशा रुग्णांचे कोरोनाने बळी घेतले व असे बहुतांश रुग्ण हे मुरगाव तालुक्यातीलच आहेत. वास्को, बायणा, सडा, नवेवाडे, खारीवाडा व मांगोरहील येथे प्रचंड भीतीचे वातावरण आहे. मांगोरहीलला गेले 47 दिवस कंटेनमेन्ट झोन आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा