शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : सिने, मालिका निर्मात्यांनी गोव्यातून गाशा गुंडाळला, सिल्व्हासा, दमणकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 21:05 IST

Coronavirus : गेले काही दिवस गोव्यात मुंबई, पुणे येथील अनेक सिने निर्माते तसेच वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांचे निर्माते चित्रीकरण करीत होते. लोकांनी त्यास आक्षेप घेतला होता.

पणजी - कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर गोवा मनोरंजन संस्थेने सर्व परवाने रद्द करीत मालिका तसेच सिनेमांच्या चित्रीकरणाला चाप लावल्याने गोव्यात शूटिंगसाठी आलेल्या निर्मात्यांनी दादरा - नगर हवेली, दमण व दीवमधील सिल्वासा तसेच अन्य भागांकडे मोर्चा वळविला आहे. गेले काही दिवस गोव्यात मुंबई, पुणे येथील अनेक सिने निर्माते तसेच वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांचे निर्माते चित्रीकरण करीत होते. लोकांनी त्यास आक्षेप घेतला होता.दोन दिवसांपूर्वी मडगाव येथील रवींद्र भवनात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी अशाच एका चित्रीकरणाला आक्षेप घेत सरकारने चित्रीकरण चालू ठेवले तर ते बंद पाडू, असा इशारा दिला होता. त्यानंतर मनोरंजन संस्थेने सर्व परवाने रद्द करीत गोव्यातील चित्रीकरणे बंद केली.गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई म्हणाले, राज्यात कोविडचे संकट जोपर्यंत निवळत नाही. तोपर्यंत गोव्यात चित्रीकरणावरील बंदी कायम राहील. ते म्हणाले की, राज्यात किमान ३० ठिकाणी सध्या चित्रीकरणासाठी आम्ही परवानगी दिली होती. केवळ इनडोअर शूटिंगला परवानगी  होती. अनेक निर्माते बंदिस्त बंगल्यांमध्ये किंवा बंदिस्त व्हिल्लांमध्ये चित्रीकरण करीत होते. परंतु तेही चालू ठेवण्यास आता परवानगी नाही कारण कोविडचा फैलाव झपाट्याने वाढलेला आहे. आणि गोमंतकीयांच्या आरोग्याच्यादृष्टीने कोणताही धोका पत्करण्यास सरकार तयार नाही. जिल्हाधिकारी तसेच पोलिस यंत्रणा यांना जो कोणी या आदेशाचा भंग करील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे ते म्हणाले.फळदेसाई म्हणाले की, उल्लंघनाच्या प्रकरणात थेट कारवाईचा अधिकार संस्थेला नाही. हे अधिकार कायदा दुरुस्ती करून घ्यावे लागतील. तसा प्रस्ताव आम्ही सरकारकडे मांडलेला आहे. दरम्यान, एका मराठी मालिकेच्या निर्मात्याने असे सांगितले की दमणमध्ये त्या सरकारने काय भूमिका घेतली आहे याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. तेथे परवानगी मिळाल्यास आम्ही 'लोकेशन' बदलणार आहोत. दरम्यान, देशात इतरत्र महामारीमुळे चित्रीकरणाच्या बाबतीत सामसूम असताना गोव्यात मात्र मराठी आणि हिंदी मालिकांचे चित्रीकरण धडाक्‍यात सुरू होते. स्टार प्लस हिंदी चॅनलवरील ' ये है चाहतें', 'शौर्य और अनोखी की कहानी', 'आप की नजरोंनें समझा' तसेच  'गुम है किसी के प्यार में' तर मराठी स्टार प्रवाह चॅनलवरील 'सुख म्हणजे नक्की काय असते', ' रंग माझा वेगळा,' झी मराठीवरील 'अगंबाई, सुनबाई', तसेच कलर्स मराठीवरील 'ऑनलाइन शुभमंगल', सोनी कलर्स मराठीवरील 'आई माझी काळुबाई', या मालिकांचे चित्रीकरण गोव्याच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात चालू होते. अनेक ठिकाणी हॉटेले किंवा व्हिल्ला भाड्याने घेऊन शूटिंग केले जात होते.

टॅग्स :goaगोवा