शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : 314 विदेशी गोव्याहून 19 विमानांमधून मायदेशी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 19:40 IST

समितीच्या सातत्याने बैठका होत आहेत. प्रधान सचिव पुनीत गोयल, प्रधान मुख्य वनपाल सुभाषचंद्रा, अर्थसचिव दौलतराव हवालदार आदी अनेक आयएएस अधिका-यांनी बैठकीत भाग घेतला.

पणजी : लॉक डाऊनच्या काळात ज्या विदेशी व्यक्ती व पर्यटक गोव्यात अडकले होते, त्यांना आतापर्यंत त्यांच्या मायदेशी पाठविण्यात गोवा सरकारला यश आले आहे. आतापर्यंत वेगवेगळ्य़ा 19 विमानांद्वारे एकूण 3314 विदेशी पर्यटक गोव्याहून मायदेशी गेले. सरकारने मुख्य सचिव परिमल रे यांच्या अध्यक्षतेखाली जी एक महत्त्वाची समिती (एसईसी) स्थापन केली आहे, त्या समितीच्या बैठकीत ही माहिती दिली गेली. समितीच्या सातत्याने बैठका होत आहेत. प्रधान सचिव पुनीत गोयल, प्रधान मुख्य वनपाल सुभाषचंद्रा, अर्थसचिव दौलतराव हवालदार आदी अनेक आयएएस अधिका-यांनी बैठकीत भाग घेतला.गोव्यातील कृषी क्षेत्रचा व कृषी उपक्रमांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. कृषी उत्पादने बाजारात आल्यानंतर त्यास ग्राहक मिळावेत म्हणून कृषी खात्याने मार्केटिंग फेडरेशनशी समन्वय ठेवावा असे बैठकी त ठरले. राज्यात 19 हार्वेस्टर्स उपलब्ध आहेत. त्यापैकी आठ हार्वेस्टरांचे काम सुरू झाले आहे. पुढील मोसमासाठी शेतक-यांना बियाणो उपलब्ध करून देण्याचेही काम सुरू आहे अशी माहिती कृषी सचिवांनी बैठकीत दिली.हार्वेस्टिंगच्या कामासाठी गोव्याबाहेरून कुणीच व्यक्ती येणार नाही, कामगार येणार नाहीत या दृष्टीने काळजी घेतली जावी अशी सूचना मुख्य सचिवांनी बैठकीत केली.राज्याच्या सीमा सिल आहेत. सरकारी सुविधांच्या ठिकाणी निगराणीखाली आता आठ व्यक्ती राहिल्या आहेत. त्यापैकी पाच मडगाव रेसिडन्सीमध्ये व तीन जुनेगोवे रेसिडन्सीमध्ये आहेत व त्यांची स्थिती ठीक आहे, अशी माहितीही बैठकीत दिली गेली. सीमांवर जे तपास नाके आहेत, तिथे असलेल्या मनुष्यबळाला पाठिंबा देण्यासाठी योग्य असे तंबू उभे केले जावेत अशी सूचना बांधकाम खात्याच्या अधिका-यांना बैठकीत केली गेली. स्टेट बँकेने एटीएम ऑन व्हील सेवा सुरू केली आहे. बँकेकडून अशा पद्धतीचा आणखी एक एटीएम लवकरच सुरू केला जाईल, असे अर्थ सचिवांनी बैठकीत स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या