शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कुंकळी औद्योगिक वसाहतीतील शिर्डी स्टील कारखान्यात आणखी 25 पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 19:44 IST

कारखाना बंद करणार: वसाहतीतल्या एकूण बाधितांची संख्या 71 वर

कुंकळी: कुंकळी औद्योगिक वसाहतीतल्या शिर्डी स्टील्स या कारखान्यात सोमवारी आणखी 25 कामगार पॉझिटिव्ह आढळून आल्याने हा कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी या वसाहतीतील आणखी दोन कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.दरम्यान, या वसाहतीत कोरोनाची बाधा झालेल्या कामगारांची संख्या 71 वर पोहोचली असून सध्या वसाहतीपूर्ती मर्यादित असलेली ही साथ गावात फैलावण्याची भीती व्यक्त होत असून ही वसाहत ताबडतोब कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करा अशी मागणी स्थानिकांकडून वाढू लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी या कारखान्यातील 126 कामगारांची चाचणी करण्यात आली होती त्यांचा सोमवारी अहवाल आला असता त्यापैकी 25 जण पॉझिटिव्ह आढळून आले.सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जे कामगार पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यांना इस्पितळात भरती करण्यात आले असून इतराना कारखान्यातच विलग अवस्थेत ठेवायचा आदेश दिला आहे. या कामगारांना बाहेर फिरण्यासाठी मज्जाव केल्याचे त्यांनी सांगितले.या वाढत्या प्रकरणावर स्थानिक नगरसेवक शशांक देसाई यांनी भीती व्यक्त केली करताना ही वसाहत कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करून या वसाहतीच्या सीमा बंद केल्या नाहीत तर हा प्रसार गावात होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी  केली.याच वसाहत परिसरात राहणारी एक बाई तीन दिवसापूर्वी बाधित आढळून आली होती. याच परिसरात दाटीवाटीने सुमारे 150 पेक्षा जास्त लोक राहत असून त्यांची त्वरित तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

वसाहतीतच कोविड केंद्रे सुरू कराकुंकळी औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा उद्रेक झालेला असल्याच्या पार्श्वभूमीवर या औद्योगिक वसाहतीतच कोविड निगा केंद्रे सुरू करा अशी मागणी आपचे एल्विस गोम्स यांनी केली आहे. कुंकळी, वेरणा आणि झुवारीनगर या वसाहतीत जास्त पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे उद्योगांनी स्वतःच्या सीएसआर निधीतून ही केंद्रे सुरू करावीत आणि स्थानिक प्रशासनाने त्यांना उपचारासाठी साहाय्य करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या