शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

CoronaVirus News: गोव्यात आणखी २ आमदार कोरोना पॉझिटिव्ह; बाधित आमदारांची संख्या ८ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 20:32 IST

CoronaVirus News: सहा आमदारांची कोरोनावर मात; दोघांवर उपचार सुरू

पणजी : राज्यात आणखी दोघा आमदारांना सोमवारी कोविडची बाधा झाली. विधानसभेच्या चाळीसपैकी आठ सदस्यांना आतार्पयत कोविडची लागण झाली. त्यापैकी सहाजण कोविडवर मात करत ठीकही झाले.सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नाडिस आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांची कोविड चाचणी सोमवारी पॉझिटिव्ह आली. टोनी हे सतत विविध रुग्णांना मदत करत असतात. त्यामुळे त्यांचा बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात व इतरत्र वावर असतो. आपल्याला कोविडची लागण झाली असे टोनी यांनी सोमवारी सायंकाळी लोकमतला सांगितले. दोनापावल येथील खासगी इस्पितळात टोनी दाखल झाले आहेत.आमदार सोपटे यांना कोविडची लक्षणो दिसत नाहीत. त्यामुळे त्यांनी होम आयसोलेशन स्वीकारले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार सुदिन ढवळीकर, नीळकंठ हळर्णकर, रवी नाईक, चर्चिल आलेमाव, क्लाफास डायस अशा आमदारांनाही कोविडची लागण झाली. क्लाफास हे कोविड झालेले पहिले आमदार होते. मुख्यमंत्री सांवत यांचा होम क्वारंटाईनचा कालावधी अजून संपलेला नाही. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना अलिकडेच कोविडमुळे महिनाभर इस्पितळात घालवावा लागला. काही मंत्री व अन्य आमदारांनीही स्वत:ची कोविड चाचणी करून घेतली आहे.दरम्यान, राज्यात कोविडमुळे आतार्पयत एकूण 300 रुग्णांचा जीव गेला आहे. काही युवकांसह अनेक ज्येष्ठ नागरिकांना जीव गमवावा लागला. रोज पाचशे ते सातशे नवे कोविडग्रस्त राज्यात आढळत आहेत. तसेच रोज पाच ते सातजणांचा कोविडमुळे बळी जात आहे. शनिवार व रविवार अशा दोन दिवसांत अठराजणांचा कोविडने जीव घेतला. यामुळे सरकारची आरोग्य यंत्रणा टीकेचे लक्ष्य बनली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या