शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात इलेक्ट्रॉनिक संगीत नृत्य महोत्सवाच्या आयोजनाविषयी मंत्रिमंडळात मतभिन्नता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 14:05 IST

ड्रग्जच्या विक्री व वापराविरूद्ध गोव्यात पोलीस खाते सक्रीय झालेले असताना इलेक्ट्रॉनिक संगीत नृत्य महोत्सव म्हणजेच ईडीएमचे आयोजन गोव्यात करण्याविषयी गोवा मंत्रिमंडळात मतभिन्नता आहे.

पणजी, दि. 19 - ड्रग्जच्या विक्री व वापराविरूद्ध गोव्यात पोलीस खाते सक्रीय झालेले असताना इलेक्ट्रॉनिक संगीत नृत्य महोत्सव म्हणजेच ईडीएमचे आयोजन गोव्यात करण्याविषयी गोवा मंत्रिमंडळात मतभिन्नता आहे. मंत्रिमंडळात यापुढे हा विषय वादाचाही ठरू शकतो. काही आमदार व मंत्र्यांना सनबर्नसारखे ईडीएम गोव्यात व्हायला हवेत असे वाटते. मात्र अशा काही महोत्सवांमध्ये अंमली पदार्थांचा वापर होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने काही मंत्री ईडीएमला विरोध करत आहेत. ईडीएममध्ये जगभरातील लाखो पर्यटक भाग घेतात व जोरदार संगीताच्या तालावर ते अखंडीतपणे नृत्य करतात.

गोव्यातील अंजुणा येथे एका संगीत नृत्य महोत्सवाप्रसंगीच गेल्या महिन्यात ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. यामुळे गोव्याचे जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर यांनी ईडीएमच्या आयोजनाला विरोध केला आहे. मंत्री पालयेकर यांचा शिवोली हा विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे किनारी भागात येतो व काही जगप्रसिद्ध किनारे त्यांच्या मतदारसंघात आहेत. मी माझ्या शिवोली मतदारसंघात तरी ईडीएम होऊ देणार नाही. माझी लढाई ड्रग्ज व्यवसायाविरुद्ध आहे. गोव्याची पिढी अंमली पदार्थांमुळे बदनाम होत आहे, असे मंत्री पालयेकर यांचे म्हणणे आहे.

काही मंत्री व आमदार मात्र ईडीएमच्या आयोजनासाठी आग्रही आहेत. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने ईडीएमसारखे उपक्रम आयोजित करणे ही गोव्याची गरज आहे, असे काही मंत्री व आमदारांचे म्हणणे आहे. ईडीएममध्ये ड्रग्जचा वापर होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी, असे काही मंत्र्यांचे म्हणणे आहे.पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांचा गोव्यात ईडीएम आयोजित करण्यास विरोध नाही. ड्रग्ज व्यवहारांविना ईडीएम होत असतील तर ते व्हायला हवेत. अंमली पदार्थ व्यवहारांना आपला विरोधच असून कुठेही असे व्यवहार दिसल्यास पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी भूमिका मंत्री आजगावकर मांडत आले आहेत.कळंगुट हा जगप्रसिद्ध किनारा आमदार मायकल लोबो यांच्या  मतदारसंघात येतो. गोव्यात येणारे  पर्यटक कळंगुटला भेट देऊन जातातच. आमदार लोबो यांचा ईडीएमच्या आयोजनाला पाठींबा आहे. सनबर्नसारखे महोत्सव गोव्यात व्हायला हवेत असे लोबो यांचे मत आहे. येत्या महिन्यापासून गोव्याचा नवा पर्यटन मोसम सुरू होत आहे. ईडीएमचे आयोजन डिसेंबर-जानेवारीत होत असते. यावेळी ईडीएम आयोजन हा मंत्रिमंडळात वादाचा विषय बनेल अशी चिन्हे आतापासूनच दिसतात.