शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

जहाजातून नाफ्ता काढणे सुरूच, जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 20:45 IST

नाफ्ताप्रश्नी सरकार मोठी लपवाछपवी करत असल्याचा लोकांचा संशय आता बळावू लागला आहे.

पणजी/ वास्को : मुरगाव पोर्ट ट्रस्टने राज्य प्रशासनाला कोणतीही दाद न देता नू शी नलिनी जहाजातील नाफ्ता काढून तो सडा येथील गणेश एन्झोप्लासटच्या टाकीत सोडणे सुरूच ठेवले. यामुळे मंत्री मिलिंद नाईक व वास्कोवासियही संतप्त बनताच दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिका-यांनी तातडीने सडा येथे व मग एमपीटीला भेट दिली आणि शेवटी सायंकाळी कारणे दाखवा नोटीस जारी केली. मुख्य सचिव परिमल रे यांनी या विषयात हस्तक्षेप करून नाफ्ता काढणो थांबवावे म्हणून मुख्य सचिवांना मंत्री नाईक यांनी 25 फोन कॉल्स केले पण त्यांच्याकडून थंडा प्रतिसाद लाभला.जिल्हाधिका-यांनी तत्काळ नाफ्ता शिफ्टींग बंद करणे गरजेचे होते असे लोकांना वाटते पण त्यांनी तसे न करता कारणे दाखवा नोटीस जारी केली. त्यांनी स्टॉप आदेश दिला नाही. कारणे दाखवा नोटीसमध्येही मोठासा दम दिसत नाही. नाफ्ता हाताळण्यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने गणेश बेन्झोप्लास्टाकडे उपाययोजना किंवा सुविधा नाहीत असे नोटिशीत म्हटले आहे. आपल्या नोटीशीला उद्या रविवारी सकाळी अकरापर्यंत उत्तर द्या, अन्यथा 2005 च्या आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याखाली काम बंदचा आदेश द्यावा लागेल असे जिल्हाधिका-यांनी बजावले आहे.नाफ्ताप्रश्नी सरकार मोठी लपवाछपवी करत असल्याचा लोकांचा संशय आता बळावू लागला आहे. मुख्यमंत्री किंवा जिल्हाधिकारी जे काही बोलतात, त्याचा मुरगाव पोर्ट ट्रस्टवर काहीही परिणाम होत नाही असे दिसून येते. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला काम करावे लागते अशी भूमिका एमपीटीने घेतल्याचे काही सरकारी अधिकारी म्हणतात. मुख्य सचिवांनी मला ते आजारी असल्याचे शेवटच्या कॉलवेळी कळवले. मी पंचवीस कॉल्स केले. ते जर आजारी आहेत तर त्यांनी मला अगोदरच तसे कळविता आले असते.- मंत्री मिलिंद नाईक

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार