पणजी : नरकासुर दहन स्पर्धा अनेक मंडळांनी मंगळवारी (दि. १0) रात्री आयोजित केलेल्या असल्याने निर्माण झालेला गोंधळ निवारण्यासाठी आसगाव येथील ज्योतिषी चिंतामणी रामकृष्ण केळकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नरकासुर दहन (मिरवणूक स्पर्धा) सोमवारी रात्री (दि. ९) व मंगळवारी पहाटे अभ्यंगस्नान आणि पोह्यांची दिवाळी असल्याची माहिती दिली. गोव्यात नरकासुर दहनाची मोठी परंपरा असली, तरी पारंपरिक दिनदर्शिकांत हा दिवस कोणता, याबाबत स्पष्ट उल्लेख असत नाही. कारण गोवा वगळता इतरत्र नरकासुर दहनाची परंपरा नाही. त्यामुळे दरवर्षी गोंधळ उडत असतो. वाचकांच्या माहितीसाठी वसुबारस ते भाऊबीज या दिवसांची तारीखवार माहिती दिली आहे. ती पुढीलप्रमाणे, या वर्षी दिवाळी हा सण म्हणजे ज्याला गोव्यात धाकटी दिवाळी, पोह्यांची दिवाळी म्हटली जाते हा सण मंगळवार, दि. १0 रोजी आहे. गोव्यात होणाऱ्या नरकासुर स्पर्धा या सोमवारी रात्री होतील व नरकासुर दहन उजाडत्या मंगळवारी होईल.
नरकासुर प्रतिमांची स्पर्धा सोमवारी रात्री
By admin | Updated: November 5, 2015 02:12 IST