शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात 44 प्रकल्पांद्वारे 2737 नोक-यांचे निर्माण : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 20:55 IST

राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) जे एकूण प्रकल्प आतापर्यंत मंजूर केले

पणजी : राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) जे एकूण प्रकल्प आतापर्यंत मंजूर केले, त्यापैकी 44 प्रकल्पांचे काम पूर्ण झाले व त्या प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष 2 हजार 237 व्यक्तींना नोक-या प्राप्त झाल्या, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.प्रश्नोत्तराच्या तासावेळी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी याबाबतचा प्रश्न मांडला होता. कुचेली येथे हाटेल प्रकल्प गेल्यावर्षी मंडळाने मंजुर केला. तो प्रकल्प चुकीच्या जागी मंजुर केला गेला आहे, त्यास लोकांचा आक्षेप आहे, असे हळर्णकर म्हणाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपण चौकशी करतो व काय ते सांगतो असे स्पष्ट केले.काही वेळा काही जण उगाच विरोध करत असतात. सासष्टी तालुक्यात तर जलवाहिन्या घालण्यासाठीही विरोध करत होते, कारण त्यांना कंत्राटदाराकडून पैसे हवे होते, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. कुचेलीच्या हॉटेलविषयी मात्र मी चौकशी करीन. लोकांच्या ज्या योग्य तक्रारी असतील, त्याकडे निश्चितच सरकार लक्ष देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पूर्वी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडे प्रकल्प मंजूर करताना स्टँडर्ड पद्धतीची प्रक्रिया नव्हती, आता ती आहे. केपीएमजी यंत्रणेची नियुक्ती आयपीबीने केली आहे. प्रकल्प मंजूर करण्याचा प्रस्ताव मंडळासमोर ठेवण्यापूर्वी प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन ती जागा कोणत्या स्थितीत आहे त्याची पाहणी करा, अशी सूचना आपण अधिका-यांना केली आहे व त्यानुसार पाहणी केली जाते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.छोट्या प्रकल्पांमध्ये गोमंतकीयांनाच नोक-या मिळत असतात. त्यांना बाहेरून बसमधून वगैरे कामगार आणणे परवडत नाही. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने एकूण 169 प्रकल्प आतापर्यंत मंजूर केले. त्यातून 12 हजार 429 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल व 27 हजार 715 रोजगार संधी निर्माण होतील. 71 नव्या उद्योगांना आयपीबीने मंजुरी दिली. त्यापैकी 15 उद्योग सुरू झाले. राज्यात अस्तित्वात असलेल्या उद्योगांपैकी 36 उद्योगांच्या विस्तारासाठी आयपीबीने मंजुरी दिली व त्यापैकी 26 प्रकल्पांचा विस्तार पूर्ण झाला.45 हॉटेलांना मान्यता दिली गेली. त्यापैकी दोन हॉटेल्स बांधून झाली, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली. आयपीबीने पूर्वी मंजूर केलेल्या प्रकल्पांपैकी 26 प्रकल्पांची मान्यता मागे घेतली गेली. त्यापैकी 14 प्रकल्प सीआरझेड क्षेत्रत होते तर उर्वरित प्रकल्प सुरूच होत नव्हते. ते सुरू करण्यात संबंधितांना रस नव्हता, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवा