शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा हात मगोपने नाकारला, आम्हाला पर्रीकरच हवे : सुदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 20:14 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने भाजपामध्ये नेतेपदाबाबत तात्पुरती तरी पर्यायी व्यवस्था करायला हवी, अशी चाचपणी भाजपच्या कोअर टीममधील बहुतेकांनी केली आहे.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असल्याने भाजपामध्ये नेतेपदाबाबत तात्पुरती तरी पर्यायी व्यवस्था करायला हवी, असे भाजपच्या कोअर टीममधील बहुतेक सदस्यांना यापूर्वी वाटले आणि काँग्रेसनेही आपले सरकार स्थापन करता येईल काय याविषयी चाचपणी करून पाहिली तरी, प्रत्यक्षात काही घडणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने मगो पक्षाला सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने सिग्नल पाठविले तरी, मगोपच्या नेत्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.पत्रकारांनी मगोपचे ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांना सोमवारी नेतृत्व बदलाच्या चर्चेविषयी विचारले असता, मंत्री ढवळीकर म्हणाले की, नेतृत्व बदलाचा विचार करण्याच्या मूडमध्ये सध्या कुणीच नाही. आम्हाला पाच वर्षे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याच नेतृत्वाखाली सरकार चालवायचे आहे. प्रशासन ठप्प वगैरे काही झालेले नाही. मी स्वत: आज 20 फाईल्सना प्रशासकीय मंजुरी दिली. मी तसेच विजय सरदेसाई, रोहन खंवटे, माविन गुदिन्हो व विश्वजित राणे हे मंत्री कोणत्याही खात्याचा विषय हाताळण्यासाठी सक्षम आहेत. मुख्यमंत्री आठ दिवस गोव्यात नसले म्हणून काम ठप्प होत नाही.मंत्री ढवळीकर म्हणाले, की मगो पक्षाच्या समितीला काँग्रेस पक्षाने सिग्नल देणे बंद करावे. काही माजी मंत्री, माजी आमदार वगैरे सध्या फिरत आहेत. सरकार स्थापनेसाठी काही जण मगोपच्या समितीला भेटून सिग्नल पाठवत आहेत. काँग्रेस पक्षात सध्या प्रचंड गोंधळ आहे. त्या पक्षाकडे सोळा आमदार आहेत पण विधानसभेत सोळा देखील उपस्थित राहू शकत नाहीत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतून एक आमदार निषेध म्हणून उठून जातो, असेही मी वाचले. गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसचेच घर सध्या सांभाळावे. स्वत:चे घर सोडून त्यांनी दुस-या पक्षाविषयी बोलू नये. जुवारी पुलाविषयी आमच्यावर विश्वास नाही, असे गिरीश चोडणकर म्हणतात मग ते काही जणांमार्फत मगोपच्या समितीला सरकार स्थापनेसाठी सिग्नल तरी का पाठवतात ते कळत नाही. काँग्रेसचे अनेक आमदार आपल्याकडे मतदारसंघातील कामे घेऊन विश्वासाने येतात व आपण त्यांची कामे करत असतो. कधीच कुणाला येऊ नका म्हणत नाही.काँग्रेसचे चार आमदार इच्छुक : लोबोदरम्यान, काँग्रेसचे चार आमदार मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या संपर्कात होते व त्यांची मुख्यमंत्र्यांशी एक बैठकही झालेली आहे, असा दावा उपसभापती तथा भाजपाचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सोमवारी येथे केला. काँग्रेसचे चार आमदार भाजपामध्ये प्रवेश करू पाहत आहेत. आम्ही उगाच कुणालाही स्वीकारणार नाही पण काँग्रेसमध्ये जे चांगले आमदार आहेत, त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले जाईल. खरेच त्या पक्षातील काही आमदार काँग्रेस पक्षाविषयी खूप नाखूश असतील तर त्यांनी भाजपात यावे. विद्यमान सरकार स्थिर आहे, असेही लोबो म्हणाले.अनावश्यक अफवा : टोनीसांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस हे लोकमतशी बोलताना म्हणाले, की आम्ही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलो असून, आम्ही काँग्रेसचेच आहोत. त्यामुळे उगाच कुणी तरी आमच्याविषयी अफवा पसरवू नयेत. आमची निष्ठा काँग्रेस पक्षासोबत आहे.

टॅग्स :goaगोवा